स्पोर्ट्स

कोलकत्ताचा ३८ धावांनी उडवला धुव्वा;बेंगळुरूचा सलग तिसरा विजय

आयपीएलच्या १०व्या साखळी लढतीत बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

विराट आणि देवदत्त पडिक्कल यांनी डावाची सुरूवात केली. पण त्यांची सुरुवात खराब झाली.

दुसऱ्याच ओव्हरमध्ये वरुण चक्रवर्तीने विराटला राहुल त्रिपाठीद्वारे बाद केले. विराट ५ धावांवर माघारी परतला.

तत्याच ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर वरुणने बेंगळुरूला दुसरा धक्का दिला. रजत पाटीदारला त्याने बाद केले.

त्यामुळे आरसीबीची अवस्था २ बाद ९ अशी झाली होती. रजतच्या जागी मैदानावर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने केकेआरच्या गोलंदाजांची पहिल्या चेंडूपासून धुलाई सुरू केली.

त्याने फक्त २८ चेंडूत अर्धशतक झळकावले. दुसऱ्या बाजूला सलामीवीर देवदत्त पडिक्कल त्याला साथ देत होता.

या जोडी संघाला १००च्या जवळ पोहोचवले आणि देवदत्त २५ वर बाद झाला. देवदत्तच्या जागी एबी डिव्हीलियर्स मैदानात आला.

मॅक्सवेल आणि एबी जोडीने पुन्हा एकदा गोलंदाजांचा समाचार घेतला. १७व्या षटकात मॅक्सवेल ७८ धावांवर बाद झाला.

त्याने ४९ चेंडूत ३ षटकार आणि ९ चौकार मारले. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर एबीकडून चौकार आणि षटकार मारण्याचे थांबले नाहीत.

त्याने मॅक्सवेलला मागे टाकत २७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. एबीने ३४ चेंडूत ३ षटकार आणि ९ चौकारांसह नाबाद ७६ धावा केल्या.

ग्लेन मॅक्सवेल आणि एबीच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर बेंगळुरूने २०५चे मोठे आव्हान दिले होते.

पण कोलकाताच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. नितिश राणा आणि शुभमन गिल यांनी सुरुवात चांगली केली होती.

पण गिल ९ चेंडूत २१ धावा करून बाद झाला आणि त्यानंतर केकेआरने सातत्याने विकेट गमावल्या.

गिलनंतर राहुल त्रिपाठी २५, नितिश राणा १८, दिनेश कार्तिक २, इयान मॉर्गन २९ धावांवर बाद झाले.

कोलकाताच्या फलंदाजांना मोठी भागिदारी करता आली नाही. बेंगळुरूकडून कायले जेमिनसनने २ युजवेंद्र चहल आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *