जयपुर मध्ये ‘द पृथ्वी शो ‘
भारतीय टीममधून वगळताच केले द्विशतक, १५२ चेंडूंत २२७ करुन नाबाद
टीम यंगिस्तान : जयपूर येथे सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफी मधिल पॉन्डेचरी विरुद्ध मुंबई या सामन्यामध्ये पृथ्वी शॉ ची बॅट तळपत असून अजुनही २२७ धावा करून तो नाबाद आहे.पृथ्वी शॉच्या गगनचुंबी षटकारांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्याच्या चौकारांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.या मध्ये त्याने 31 चौकार व 5 षटकरांची आतिशबाजी केली . व त्याला सूर्यकुमार यादव याने 58 चेंडूत 133 धावा काढून सुरेख साथ दिली. या दोघांच्या फलंदाजीमुळे संघाने 50 षटकात 457 धावांचा डोंगर उभा केला .