युसुफ पठाण क्रिकेटमधून निवृत्त.
२००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून युसुफने ५७ एकदिवसीय सामने आणि २२ टी -२० सामने खेळले. भारताने आयसीसी टी -२० विश्वचषक २००७ आणि आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०११ मध्ये जिंकलेल्या संघाचा तो भाग होता.खालच्या फळीतील फलंदाज आणि ऑफ स्पिनर म्हणून युसुफने ८१० एकदिवसीय धावा आणि विश्व टी -२० मध्ये २३६ धावा केल्या आहेत. तसेच मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ४६ बळीही मिळवले आहेत.
युसुफने त्याच्या निवेदनात लिहिले
आज माझ्या आयुष्यातील या खेळीला पूर्ण विराम देण्याची वेळ आली आहे. मी सर्व प्रकारच्या खेळामधून अधिकृतपणे निवृत्तीची घोषणा करतो.
“भारतासाठी दोन विश्वचषक जिंकणे आणि सचिनला माझ्या खांद्यावर उभे करणे हे माझ्या कारकिर्दीतील काही सर्वोत्कृष्ट क्षण होते,” असेही तो म्हणाला.
युसुफने १०० प्रथम श्रेणी सामन्यांत ४८२५ धावा केल्या आणि २०१ विकेट्सही घेतल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये उजव्या हाताच्या फलंदाजाने ४७९७ धावा जमवल्या आणि १९९ सामन्यांमधून १२४ बळीसुद्धा मिळवलेले आहेत . टी -२० मध्ये पॉवर हिटर म्हणून युसूफ सर्वात प्रभावी होता. २४४ टी -२० सामन्यामध्ये त्याने ४८५२ धावा १३९.३४ च्या स्ट्राईक रेटने केल्या. आणि प्रति षटक ७.६ धावांच्या इकॉनॉमी दराने ९९ विकेट्ससुद्धा घेतल्या.तो मार्च २०१२ मध्ये जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरूद्ध शेवटचा एकदिवसीय सामन्यात खेळला होता.