15000डॉलर केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ डब्लूटीटी कप पुरुष टेनिस स्पर्धेत इशाक इकबालचा मानांकित खेळाडूवर विजय
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित 15000डॉलर केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ डब्लूटीटी कप पुरुष टेनिस स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत इशाक इकबाल याने दुसऱ्या मानांकित नितीन कुमार सिन्हाचा टायब्रेकमध्ये 7-6(5), 7-6(4) असा पराभव करून अंतिम पात्रता फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर आजूपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पाहिल्या पात्रता फेरीत भारताच्या चौदाव्या मानांकित दिग्विजय प्रताप सिंगने तुषार मदनचा 6-4, 6-3 असा तर, अमेरिकेच्या तिसऱ्या मानांकित ओमनी कुमारने भारताच्या जगमीत सिंगचा 6-4, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. भारताच्या सातव्या मानांकित एन. विजय सुंदर प्रशांत याने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या संदेश कुरळेचा 6-2, 6-2 असा सहज पराभव करून पात्रता फेरीच्या अंतिम चरणात प्रवेश केला. संघर्षपूर्ण लढतीत नवव्या मानांकित चंद्रिल सूद याने यश चौरसियाचा टायब्रेकमध्ये 2-6, 7-6(4), 15-13 असा पराभव केला. ग्रेट ब्रिटनच्या हेनरी पाटेन याने भारताच्या अर्जुन महादेवनवर 6-1, 6-3 असा विजय मिळवला.
भारताच्या ऋषी रेड्डी, पारस दाहिया, मुतु आदीथ्य सेंथीलकुमार, रणजीत विराली-मुरुगुसेन, अनिरुद्ध चंद्रसेखर आर, सूरज आर प्रबोध यांसह ग्रेट ब्रिटनच्या जोनाथन बिंडिंग, हेनरी पॅटन, रोमानियाच्या जॉर्ज बोटझेन, अमेरिकेच्या प्रेस्टन ब्राऊन या खेळाडूंनी पात्रता फेरीच्या अंतिम चरणात प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी:
पुरुष गट:
अनिरुद्ध चंद्रसेखर(भारत) [1]वि.वि.कपिश खांडगे(भारत)6-1, 6-1;
इशाक इकबाल(भारत)वि.वि.नितीन कुमार सिन्हा(भारत) [2] 7-6(5), 7-6(4);
ओमनी कुमार(यूएसए)[3] वि.वि.जगमीत सिंग(भारत)6-4, 6-4;
हेनरी पॅटन(ग्रेट ब्रिटन) [4] वि.वि.अर्जुन महादेवन(भारत)6-1, 6-3;
जॉर्ज बोटझेन(रोमानिया)[5] वि.वि.अनुराग नेनवानी(भारत)6-2, 6-1;
ऋषी रेड्डी(भारत)[6] वि.वि.बुपती सक्तिवेल(भारत)6-3, 6-0;
एन. विजय सुंदर प्रशांत(भारत) [7]वि.वि.संदेश कुरळे(भारत)6-2, 6-2;
मुतु आदीथ्य सेंथीलकुमार(भारत)[8] वि.वि.अनर्घ गांगुली(भारत)6-0, 6-4;
चंद्रिल सूद(भारत) [9] वि.वि.यश चौरसिया(भारत)2-6, 7-6(4), 15-13;
फैजल कुमार(भारत)[10]वि.वि.साहिल गवारे(भारत)7-6(8), 6-4;
सूरज आर प्रबोध(भारत)[11]वि.वि.गुंजन जाधव(भारत)6-0, 4-6, 10-8;
पारस दाहिया(भारत)[12]वि.वि.नीरज यशपॉल(भारत)6-4, 7-5;
रणजीत विराली-मुरुगुसेन(भारत)[13]वि.वि.दिमित्री बास्कोव्ह(मोलदोव्हा)6-0, 6-3;
दिग्विजय प्रताप सिंग(भारत) [14] वि.वि.तुषार मदन(भारत) 6-4, 6-3;
लिओनार्ड कॅटनी(इटली)[16]वि.वि.जोनाथन बिंडिंग(ग्रेट ब्रिटन)7-6(4), 7-5;
प्रेस्टन ब्राऊन(यूएसए)[15]वि.वि.विग्नेश पेरनामाल्लूर(भारत)6-4, 6-0