अशी करा लाकडी भांड्यांची स्वच्छता
स्वयंपाक घरासाठी स्टीलच्या भांड्यांपेक्षा माती आणि लाकडाच्या भांड्यांचा वापर वाढला आहे , शिवाय अशा भांड्यातून पदार्थ करणं खूप छान नाही वाटतं , आजकाल मार्केटमध्ये निरनिराळ्या आकाराचे लाकडी भांडी मिळतात. मात्र ही लाकडी भांडी वापरल्यावर तेल आणि मसाल्यांमुळे ती चिकट दिसू लागतात , शिवाय झाल्यावर धुवून कपाटात काही दिवस ठेवल्यास त्यावर हवामानातील बदलामुळे बुरशीचा थर जमा होतो, म्हणून घरातील लाकडी भांडी स्वच्छ कशी करायची यासाठी या काही युक्त्या!!
मिठाचा वापर करा :
लाकडी भांडी साबण अथवा लिक्विड स्प्रे ने स्वच्छ करण्याऐवजी मीठाणे स्वच्छ करा , ज्यामुळे ती स्वच्छ तर होतीलच शिवाय निर्जंतुक होतील, मिठाने लाकडी भांडी स्वच्छ केल्यास त्यावर बुरशी जमा होणार नाही. यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करा , आणि त्यात एक चमचा मीठ टाका, या पाण्यात काही वेळ लाकडी भांडी बुडवून ठेवा थोड्यावेळाने ती बाहेर काढा, आणि उन्हात सुकवा. या पद्धतीने स्वच्छ केल्यास घरातील लाकडी भांडी पुन्हा चमकू लागतील.
बेकिंग सोडा वापरा :
बेकिंग सोडा घरातील अनेक गोष्टी स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येतो लाकडी भांडी स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस घ्या , आणि भांड्यांवर हे मिश्रण लावा लावण्या घालवण्यासाठी थोडावेळ चोळून घ्या, त्या नंतर साध्या पाण्याने भांडी दुवा आणि सुकवा या पद्धतीने ही तुमची लाकडी भांडी पुन्हा पहिल्याप्रमाणे चमकू लागतील.
लिंबाचा रस :
लिंबा मध्ये सायट्रिक ऍसिड असल्याने भांडण वरील चिकटपणा निघून जातो , जर ही भांडी चांगली स्वच्छ केली नाही तर त्यावर ओल्या त्यामुळे बुरशी जमा होते, यासाठीच एका मोठ्या भांड्यात कोमट पाणी घ्या ,आणि त्यात लिंबाचा रस मिसळा या पाण्यात वापरलेली भांडी कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटे बुडवून ठेवावे त्यानंतर भांडी घासून घ्या , आणि पंख्याखाली अथवा तुम्ही अशा प्रकारे कोणत्याही आंबट फळाने जसे की चिंच आवळा कोकम तुमची लाकडी भांडी स्वच्छ करू शकता.