स्कॉर्पिओला सरंक्षण देण्यासाठी सरकारी इनोव्हाचा वापर
स्फ़ोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओला एंटेलियापर्यंत पोहचवण्यासाठी सरकारी इनोव्हा गाडीचाचा उपयोग केला अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे .
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वझे यांचे नाव प्रकर्षाने पुढे येत आहे. ह्याच केस मध्ये आता नवीन वळण येत आहे.स्पोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ला सरंक्षण देत एंटेलियापर्यंत पोहचवण्यासाठी सचिन वझे यांनी स्वतःच्या सरकारी इनोव्हा कारचा उपयोग केला व स्वतः २५ फेब्रुवारीला घटनास्थळापर्यंत गेले असा खुलासा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) केला आहे .
cctv फुटेज मध्ये ppe किट घतलेली व्यक्ती सचीन वझेच होते व त्यांनीच नंतर ppe किट नष्ट केल्याचे काही पुरावे NIA च्या चौकशी दरम्यान सापडले आहेत. ppe किट च्या आतून घातलेले कपडे सुद्धा मर्सिडीज कार मधून जप्त केले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
मर्सिडीजचा केसशी काय संबंध
सचिन वझे वापरत असलेली मर्सिडीज कार ही मंगळवारी रात्री NIA कडून जप्त करण्यात आली. कारमधून स्फ़ोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओची खरी नंबर प्लेट,नोटा मोजण्याची मशीन,५ लाख रोख रक्कम,कपडे ,बीअरच्या बाटल्या आणि केरोसीन मिळाले आहे. ppe किट जाळण्यासाठी केरोसीन चा उपयोग तर झाला नाही ना ? असा संंशय वर्तवण्यात येेेत आहे.
वझे हेच मर्सिडीज कारचा उपयोग करत होते याची खात्री NIA चे IG अनिल शुक्ला यांनी केली आहे.