विनेश फोगट, बजरंग पुनियाला सुवर्णपदक
भारताच्या विनेश फोगट हिने ५३ किलो गटात कॅनडाच्या कुस्तीपटू ला रँकिंग सीरिज कुस्ती स्पर्धेत नमवून सुवर्णपदक पटकावले. तसेच पुरुष ६५ किलो गटात भारताचा अव्वल कुस्तीपटू बजरंग पुनिया ने मंगोलियाच्या कुस्तीपटू तुळगा तुमुर ह्याला नमवून विजेतेपद मिळविले. २७ वर्षीय बजरंग ने उपांत्य फेरीत अमेरिकेच्या जोसेफ क्रिस्तोफर ह्याला ६-३ पराभूत करून धडाक्यात अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
ह्या विजयानंतर विनेश फोगट ५३ किलो गटात विश्व क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहचली आहे. ऑलिम्पिक स्पर्धा जवळ येत असता ही कामगिरी भारतीयांसाठी आनंददायक आहे. २६ वर्षीय विनेशने ह्या स्पर्धेत प्रतिस्पर्धी ला एकही गुण दिला नाही आणि अंतिम फेरीत कॅनडाच्या डायना मरी विस्कावर ४-० ने मात केली.ह्या महिन्यातले विनेश चे हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे. ह्याच स्पर्धेत नर्सिंग यादव इटलीच्या फिनिझिओला शी परभुत झाला आणि त्याला ब्राँझ मेडल साठी लढावे लागले.ही स्पर्धा ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा आहे आणि ह्या स्पर्धेनंतर २ पात्रता स्पर्धा शिल्लक आहेत. भारताचे आतापर्यंत ४ कुस्तीपटू ऑलिम्पिक साठी पात्र झाले आहेत.