मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ विचारवंत प्रा. विलास वाघ यांना श्रद्धांजली
ज्येष्ठ विचारवंत, सुगावा प्रकाशनाचे संपादक प्रा. विलास वाघ यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. प्रा. वाघ यांच्या निधनामुळे सामाजिक चळवळींचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींना दिशा देण्यासाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सर्वांपर्यंत पोहचावा यासाठी प्रा. विलास वाघ यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांनी अनेकांना लिहीण्याची प्रेरणा दिली. या लेखकांना मराठी साहित्य प्रवाहांमध्ये स्थान मिळावे यासाठी प्रयत्न केले. सामाजिक चळवळींतील कार्यकर्ते, पत्रकार, अभ्यासकांसाठी ते मार्गदर्शकस्थानी होते. त्यांच्या निधनामुळे सामाजिक चळवळींचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे. प्रा. विलास वाघ यांना भावपूर्ण श्रद्धांजली.