महाराष्ट्रात लसींच्या तूटवड्यावरून राजकारण पेटले
महाराष्ट्र शासन लसींचा तुटवडा भासत असल्याचे सांगत असताना सर्वात जास्त लसीकरण हे महाराष्ट्रात झाले आहे. असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दावा केला आहे. भारतात ९,०१,९८, ६७३ लसींचे डोस दिले होते त्यापैकी ९.९२ टक्के म्हणजे ८९,४९,५६० इतके लसीचे डोस महाराष्ट्रला मिळाले आहे तर ९.१९ टक्के म्हणजे ८२,८७,८४० इतके लसीचे डोस राजस्थान व ९.०३ टक्के म्हणजे ८१,४७,६८९ इतके लसीचे डोस गुजरातला मिळाले आहे. दररोज कोरोनाचे रुग्ण वाढीमध्ये एक दिवसात १,२६,७८९ ने भर पडली आहे. त्यापैकी ५९,९०७ नवे रुग्ण आणि ३२२ मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत. महाराष्ट्रात लसींच्या तुटवड्यामुळे मुंबई, पुणे ई. ठिकाणी लसीकरणाचे अनेक केंद्र बंद आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, ‘गुजरातपेक्षा दुप्पट म्हणजेच महाराष्टात महिन्याला १.०६ कोटी लसींची गरज आहे. मात्र असे असूनही गुजरात व महाराष्ट्र प्रत्येकी १ कोटी लस देण्यात आल्या आहे ही बाब अन्यायकारक आहे.’महाराष्ट्र शासनाचे लसीकरणाचे काम चोख नसून लसींचा तुटवडा असल्याचा आरोप खोटा असल्याचे डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले. ‘महाराष्ट्र सरकारची जबाबदारीने काम करण्याची क्षमता अनाकलनीय आहे व लोकांमध्ये भीती पसरविणे अजून मूर्खपणाचे आहे. असे वक्तव्य डॉ हर्ष वर्धन यांनी केले आहे.’ पुढे जोडत ते म्हणाले की, ‘ महाराष्ट्रातील लोकप्रिनिधींना लसींच्या कमतरतेबाबत विधाने करताना मी पाहिले आहे. हे महाराष्ट्र सरकारचे महामारी रोखताना आलेल्या अपयशापासून लक्ष भरकटविण्याचा प्रयत्न असून दुसरं काही नाही.’