मॅच फिक्सिंग प्रकरण;संयुक्त अरब अमिरातीचे दोन क्रिकेटपटुंवर ८ वर्षाची बंदी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी संयुक्त अरब अमिराती (UAE) चे दोन क्रिकेटपटू मोहम्मद नावीद आणि शैमान अन्वर बट असं या क्रिकेटपटूंची नावं आहेत. टी -२० वर्ल्डकपच्या २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत मॅच फिक्स करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपानंतर ९ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
या दोन खेळाडूंवर ही बंदी १६ ऑक्टोबर २०१९ पासून लागू होईल जेव्हा त्यांच्यावर मॅच फिक्सिंग आणि ICCच्या भ्रष्टाचारविरोधी नियमांचा भंग केल्याचा आरोप झाला. ३३ वर्षीय माजी कर्णधार नवीद UAE कडून ४० वन डे आणि ३१ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. आयसीसीने जारी केलेल्या निवेदनात, आयसीसीच्या ‘इंटिग्रिटी युनिट’चे सरव्यवस्थापक अलेक्स मार्शल यांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद नावीद आणि शिमन अन्वर यांनी युएईचे प्रतिनिधित्व केले होते.
नवीदची कर्णधार आणि सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू म्हणून वेगळी ओळख होती. दोन्ही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे अनेक सामने खेळले आहेत.या दोन्ही खेळाडूंनी मात्र आपल्या टीम सोबतच UAE क्रिकेटचाही विश्वासघात केला. त्यांच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप लावण्यात आला आहे. या दोन्ही खेळाडूंवर झालेल्या आरोपाची गंभीर दखल घेऊन ICC ने ८ वर्षांसाठी दोन्ही खेळाडूंवर बंदी घातली आहे. टी १० लीग २०१९ मधील सहभागींसाठी अमिरात क्रिकेट मंडळाच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेच्या गोष्टींचा भंग केल्याबद्दलही नावेद दोषी ठरला.