स्पोर्ट्स

आयपीएल मध्ये दिले जाते पैशाला महत्त्व – डेल स्टेन

PSL चे कौतुक करताना केले विवादास्पद विधान 

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळण्यापेक्षा पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणे अधिक फायद्याचे आहे, असे मत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या माजी गोलंदाजनं केलं. आयपीएलमध्ये बराच पैसा आहे, परंतु तिथं क्रिकेट कुठेतरी मागे पडल्यासारखं वाटतं, असेही तो म्हणाला.सध्या सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीग मध्ये सर्फराज अहमद याच्या नेतृत्वाखालील क्युएत्ता कलंदर्स संघाकडून खेळत आहे.

आयपीएलमध्ये डेल स्टेन डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात लायन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघांकडून खेळला आहे. २०२१च्या आयपीएलमधून त्यानं माघार घेतली.  एक्स्प्रेस ट्रीबूनशी बोलताना स्टेन याने आयपीएलच्या १४व्या पर्वातून माघार घेण्यामागचं कारण सांगितले. तो म्हणाला,” मला काही काळ विश्रांती हवी होती. पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणं हे अन्य फ्रँचायझी लीगपेक्षा एक खेळाडू म्हणून अधिक फायद्याचे आहे. आयपीएलमध्ये खेळताना मोठे संघ असतात, मोठी नावं असतात, खेळाडूंसाठी मोजलेल्या पैशांवर अधिक भर दिला जातो आणि अशात क्रिकेट कुठेतरी मागे पडतं.”पाकिस्तान सुपर लीग किंवा श्रीलंकन प्रीमिअर लीगमध्ये क्रिकेटला अधिक महत्त्व दिले जाते. मला इथे येऊन थोडेच दिवस झाले आहेत आणि इथे भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला फक्त क्रिकेटबद्दल जाणून घ्यायचं असतं. आयपीएलमध्ये मी हे सर्व विसरतो आणि आयपीएलमध्ये यंदा किती पैसा मिळणार, हाच एक प्रमुख मुद्दा चर्चिला जातो,” असेही स्टेन म्हणाला.
सध्या पाकिस्तान सुपर लीग खेळणाऱ्या डेल स्टेनला विशेष कामगिरी करता आली नाही. २ दिवसापूर्वी क्रिकेट चाहत्यांनी त्याच्या प्रभावशून्य गोलंदाजी वर भरपूर टीका केली होती. पहिल्या सामन्यात त्याने चार षटकात ४४ धावा दिल्या होत्या. आतापर्यंत तो फक्त दोन विकेट घेऊ शकला आहे.
ह्या विधाना नंतर स्टेन ला आयपीएल समर्थकांनी चांगलेच ट्रोल केले .

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *