इकॉनॉमी

टाटा ग्रुप बिग बास्केट विकत घेणार; ऑनलाइन किराणा बाजारात उतरायची तयारी

भारतीय कंपनी टाटा सन्स यांनी चायनामधील “अलिबाबा”चा वित्तपुरवठा असलेले ऑनलाइन किराणा विक्रेता बिगबास्केटमध्ये बहुतांश हिस्सा खरेदी करण्याची योजना आखली आहे.

शुक्रवारी देशाचा अँटी ट्रस्ट संस्थेकडे दाखल केलेल्या एका अहवालात हे समजले.

१५० वर्षांहून अधिक व्यापारात असणारा टाटा ग्रुप गाड्यांपासून सॉफ्टवेअरपर्यंत सर्व प्रकारच्या व्यवसायात कार्यरत आहे.

बिगबास्केट सोबतचा हा करार मंजूर झाल्यास टाटा थेट ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत ऑनलाइन किराणा सेवेच्या बाजारात उतरेल.

टाटा डिजिटल लिमिटेड या कंपनीने भारतीय स्पर्धा आयोगाकडे अर्ज दाखल करताना बिग बास्केटमध्ये व्यवसाय-ते- व्यवसाय अर्थात “बिझनेस टू बिझनेस” विक्री करणाऱ्या संस्थेचा ६४.३% टक्के एवढा हिस्सा खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

या कराराची किंमत एक अब्ज डॉलरहून अधिक असू शकते.

ई-कॉमर्स अर्थात ऑनलाइन विक्रीचा वेग भारतात वाढत चालला आहे. त्यात कोरोना महामारीमुळे अन्नधान्य आणि किराणादेखील लोक ऑनलाईन घेत आहेत.

याच पार्श्वभूमीवर टाटा सन्सचा हा प्रस्ताव त्यांना खूप फायदेशीर ठरू शकेल असे अंदाज बांधले जात आहेत.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *