स्पोर्ट्स

स्विस ओपन:- सिंधू ला उपविजेतेपद

अंतिम फेरीत कॅरोलिना मरीन कडून सरळ सेट मध्ये पराभव. 

बेसल, (स्विझरलँड) येथे सुरू असलेल्या स्विस ओपन सुपर ३०० स्पर्धेत सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पेनची ऑलिम्पिक विजेती कॅरोलिना मरीन हिने तिच्या स्पूर्ती आणि अचूकतेच्या जोरावर सिंधू ला १२-२१,०५-२१ असे सरळ सेट मध्ये हरवले. हा सामना केवळ ३५ मिनिटे चालला.हा सिंधू चा मरीन विरुद्ध सलग तिसरा पराभव आहे. गतवर्षी झालेल्या सुपर १००० स्पर्धेच्या दोन्ही सामन्यात तसेच थायलंड ओपन मध्ये मरीन ने सिंधू ल पराभूत केले होते. सिंधूने १८ महिन्यात पहिलीच अंतिम फेरी गाठली होती. जागतिक क्रमवारीत सिंधू ७ व्या क्रमांकावर आहे तसेच मरीन तिसऱ्या स्थानावर आहे.ह्या वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकसाठी ही पात्रता स्पर्धा होती. पात्रता स्पर्धा १५ जून पर्यंत चालणार आहेत, भारताच्या सिंधू आणि साईना नेहवाल महिला एकेरीत पात्र होण्याची अपेक्षा बॅडमिंटन चाहत्यांकडून असेल. पुढील स्पर्धा इंग्लिश चॅम्पियनशिप सुपर १००० होणार आहे आणि सिंधू काढून ह्याहून उत्तम कामगिरी ची अपेक्षा असेल.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *