ब्लॉकबस्टर चित्रपट निर्माते, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा आज जन्मदिवस; जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास…
संजय लीला भन्साळी हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथा, लेखक आणि संगीत निर्माता आहे. ते भारतीय चित्रपट व दुरदर्शन संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी १९९९ मध्ये एसएलबी फिल्म्स नावाचे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले. आणि तेव्हा पासूनचित्रपट सृष्टीत सुरु झालेला त्यांचा प्रवास आजही कायम आहे.
संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या करीयरची सुरवात विधु विनोद चोप्रा यांच्या सहाय्याने केली होती. त्यांच्या करियरमध्ये देवदास हा चित्रपट २००२ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. आणि याच चित्रपटाने त्यांना उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ओळखही दिली. या चित्रपटात मुख्य भूमिकेत शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित हे होते. या चित्रपताने भारताच्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेच्या चित्रपटाचा अकादमी पुरस्कार जिंकला. त्यांच्या अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट आठव्या क्रमांकावर आहे. आणि आजही प्रेक्षक आवर्जून त्याला बघतात.
अलीकडीच्या काही वर्षांमध्ये त्यांच्या करिअरला वेग मिळाला आहे. ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ अशा ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शक त्यांनी केले ज्यांनी कोटींचा गल्ला तर जमावलाच परंतु तितकेच वादग्रस्त राहिले. संजय लीला भन्साळी यांनी सर्व अडचणींना तोंड देत चित्रपटाला प्रदर्शित केले आणि प्रेक्षकांच्या पसंतीसही ते पडले. भन्साळीच्या आगामी चित्रपटांमध्ये आणखी एक थोर चित्रपट सामील होणार आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ हा तो चित्रपट आहे, ज्यात आलीय भट मुख्य भूमिकेत आहे.
२०१५ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘ब्लॅक’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार यासह त्यांना अनेक वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इतर अनेक पुरस्कारांनीही त्यांना गौरवण्यात आले आहे. भारतीय चित्रपट सृष्टीत आपले नाव सुवर्ण अक्षरांत लिहिणाऱ्या संजय लीला भन्साळी यांना यंगिस्तान तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा.