एमजीएम वर्ल्डमहाराष्ट्र

मासिक-पाळीसारख्या मुद्द्यावर जनजागृतीसाठी सरसावली युवापिढी

एमजीएमच्या ऋषिकेश खंडाळेची ‘सुखीभव’ फेलोशीपसाठी निवड,या आधी रुपल देशमुखची सुद्धा झाली होती निवड.

मासिक पाळीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा केला गेलेला प्रयत्न म्हणजे “सुखी भव”.

मासिक पाळीप्रती असलेल्या धारणा फक्त महिलांचे शोषणच नाही,तर देशाचा विकास खुंटवण्याचं सुद्धा काम करत असते.

सामाजिक आणि आर्थिक विकासात सर्वसमावेशकता गरजेची असते.

त्यामुळे समाजातील सर्व घटकांसोबतच देशातील दुर्बळ आणि ग्रामीण भागातील महिलांना सुद्धा मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.

सुखी भव ही संस्था नेमकं काय काम करते,मासिक पाळी येणे संपविण्याकरिता आणि मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या पद्धती, लैंगिक पुनरुत्पादक

आरोग्य-शोध घेणारी वागणूक आणि महिला आणि मुलींची गतिशीलता सुधारण्यासाठी सुखिभावा भारतभरातील शहरी गरीब आणि ग्रामीण भागातील लोकांसोबत कार्य करते.

समाज आणि शाळांमध्ये या निषिद्ध विषयांवर चर्चा करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही सुरक्षित मोकळी जागा तयार करतो,

राज्य सरकारे, शिक्षक, आघाडीच्या कामगार, पुरुष आणि मुलांबरोबर भागीदारी करण्यासाठी आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी

आणि स्त्रिया आणि मुलींविषयीचे ज्ञान, दृष्टीकोन आणि वागणुकीत बदल टिकवून ठेवू शकतो,मासिक पाळीला भारतभरातील उपेक्षित समाजात नॉन-इश्यू बनविणे.

महात्मा गांधी मिशन विद्यापिठाचा विद्यार्थी ऋषिकेश खंडाळे सुद्धा या मोहिमेत सक्रिय सहभाग घेणार आहे,

सुखी भव मार्फत दिल्या जाणाऱ्या फेल्लोवशीपचा तो मानकरी ठरलेला आहे ही आमच्या विद्यापीठासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

त्यांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आणि आश्वासक आहे,त्यांची प्रतिक्रिया थोडक्यात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस म्हणतात, की कुठल्याही समाजाचा विकास मी त्या समाजाच्या महिलांच्या विकासावर ठरवेन,

आणि जेव्हा आपण मासिक पाळी बद्दल rutgers च्या एका अहवालानुसार शाळा सोडणाऱ्या मुलींपैकी २३% मुली या मासिक पाळी सुरू होते म्हणून शाळा सोडतात,

unicefच्या एका अभ्यासानुसार दक्षिण आशियामधील प्रत्येक ३ पैकी एका मुलीला मासिक पाळी येईपर्यंत मासिक पाळी म्हणजे काय, हे माहीतच नसत.

भारतातही १०% मुली याला आजार समजतात, या सगळ्या आकडेवारीमधून हे लक्षात येत की, विकसित समाजाकरिता,

महिला सक्षमीकरणाकरीता मासिक पाळी या विषयावर काम करणे किती गरजेचं आहे, यामध्ये काम करत असताना महिलांबरोबर पुरुषांचीही मानसिकता बदलणे गरजेचे आहे.

त्यामुळे मासिक पाळी याविषयी जनजागृती करत असलेल्या मी सुखीभव:तर्फे घेण्यात येणाऱ्या पिरेड फेलोशिपमध्ये सहभाग घेतला

आणि माझी निवड पण झाली त्यामुळे, हे काम करण्याकरता मी खूप उत्सुक आहे.

दोन वर्षांपूर्वी एमजीएमच्या पत्रकारितेची विद्यार्थिनी असलेली रुपल देशमुख ही सुद्धा या मोहिमेची एक भाग आहे,तिची निवड सुद्धा फेलोशिपमार्फतच झाली होती,

तिच्या याच कार्याबद्दल तिला एमजीएमचा सक्षमा पुरस्कारसुद्धा मिळाला होता.

त्यांना या मोहिमेबद्दल विचारलं असता त्या म्हणाल्या” ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाला असतांना माझी सुखीभव संस्थेमार्फत आयोजित पिरियड फेलोशिप साठी निवड झाली.

पत्रकारितेचे शिक्षण घेऊन समाजकार्यात जाणे हे थोडं वेगळंच होत. पण या फेलोशिप संदर्भात वाचल्यावर हे कळले की ,

ज्या गोष्टी माझ्या किशोरवयात घडल्या त्या कुठल्या दुसऱ्या मुलीसोबत नको घडायला आणि त्यासाठीच म्हणून मी या संधीचा उपयोग करून त्यांच्यापर्यंत पोहचू शकते

आणि हेच एक मूळ कारण की मी या फेलोशिपला गेले.

फेलोशिपसाठी मला पुणे हे शहर काम करण्यासाठी देण्यात आले होते.

२०१८ ते २०१९ मध्ये मी पुण्यात या विषयाला घेऊन काम केले. बरेच सुंदरसे अनुभव मला यातून मिळाले, आणि ते कायम माझ्या सोबत असणार आहे.

या फेलोशिप ने मला या सामाजिक विकास क्षेत्रात काम करण्यासाठी घडवल. ही फेलोशिप म्हणजे माझ्यासाठी एक आयुष्य बदलवणारा अनुभव आहे.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *