लाइफस्टाइल

कोणत्या कपड्यावर कसे दागिने निवडायचे?

आज काल प्रत्येक स्त्रीला कोणत्या कपड्यांवर कसे दागिने घालावे याचा प्रश्न नक्कीच पडत असतो. आपले कपडे कसे सुंदरदिसतील त्यावर कोणते दागिने घालावे कोणते घालू नयेत हे आपण  पुढील प्रमाणे पाहूया-

) कपड्यांचा अंडर टोन  आणि दागिन्यांचा अंडर टोन मॅच करावा कोणत्याही रंगाचे मूळ तीन भाग असतात. जर तुम्ही गुलाबी रंगअतिशय फिक्कट घेतला तर तो रंग थंड गटामध्ये येणार.  पण तोच गुलाबी रंग त्याच्यामध्ये थोडासा पिवळा आणि काळसर रंग जोडलात्यामुळे तर तो थोडासा मध्यम गुलाबी रंग दिसून येतो.

त्याला न्यूट्रल टोन असेही म्हंटले जाते. आणि जर एखादा गुलाबी रंग गडद व धम्मंट असेल जसे की राणी गुलाबी हे पूर्णतः उष्ण गटामध्येयेते. अशाप्रकारे दागिन्यांचे ही तीन अंडर टोन असतात. उदाहरणार्थ सोनेरी, चंदेरी आणि मध्यम असे आपण तीन भाग करूयात जरआपण जर्द काळा रंग असलेला गडद गुलाबी घातलेला  गरम गटामध्ये येतो. तर गरम गटामध्ये येणारे दागिने हे सोनेरी असतात त्यामध्येसोनेरी दागिने घेतले तर त्यात कोणत्याही धातूचा बंधन नसते कारण रंगाप्रमाणे त्याचे वर्गीकरण केले पाहिजे.

)मध्यम रंग म्हणजे लाल, काळा व पांढरा असे जे युनिवर्सल रंग जातात. त्यात शुद्ध चांदीचे दागिने पण ते ऑक्सी डाईज झालेलेम्हणजे जे दागिने ट्रायबल झालेले आहे असे दागिने मधल्या म्हणजेच मध्यम गटामध्ये बसतात. हे दागिने थंड रंगाच्या कपड्यांवरअतिशय सुंदर व उठून दिसतात.

) दागिन्यांमध्ये दोन प्रकार असतात पहिले म्हणजे हलवता येणारे आणि दुसरा प्रकार म्हणजे चमकणारे आणि नचमकणारे.

) स्टेटमेंट ज्वेलरी म्हणजे याचा अर्थ ठसठशीत आपल्यासमोर मांडला गेलेला नमुना. या दागिन्यांमध्ये मोठे मोठे हिरे व किंवा मोतीअसतात आणि ते वजनाला सुद्धा जड असतात.जास्त दागिने घालण्याची इच्छा नसेल किंवा काही सुचत नसेल कोणता दागिना घालावातर हा दागिना अतिशय उत्तम आहे. एकच असा दागिना जो सर्वोत्तम लक्ष वेधून घेईल.

अशा प्रकारचे दागिने मुळे एक वेगळ्या प्रकारचे सौंदर्य खुलून येते आणि हे हा दागिने इंडियन किंवा वेस्टन कपड्यांवर शोभून दिसतो.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *