पॉलिटीक्समहाराष्ट्र

दहावी-बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर;२९ एप्रील ते २० मे दरम्यान होणार परिक्षा

एप्रिल-मे २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक १६/०२/२०२१ पासून उपलब्ध करून देण्यात आलेली होती. सदर वेळापत्रकांबाबत सुचना असल्यास मंडळाकडे दिनांक २२/०२/२०२१ पर्यंत लेखी स्वरूपात मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार संघटना, पालक, शिक्षक व विद्यार्थी यांचेकडून प्राप्त झालेल्या सूचनांचे अवलोकन करून, इ.१२वी व इ.१०वी ची संभाव्य वेळापत्रकेच अंतिम करण्यात आलेली आहेत. अंतिम वेळापत्रकानमार लेखी परीक्षा खालील कालावधीत आयोजित केलेल्या आहेत.
लेखी परीक्षा कालावधी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (पुनर्रचित व जुना अभ्यासक्रम) शुक्रवार दि. २३ एप्रिल २०२१ ते शुक्रवार दि. २१ मे २०२१
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा गुरुवार दि. २९ एप्रिल २०२१ ते ) गुरुवार दि. २० मे २०२१ उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेली आहे.

काय असेल दहावीचा वेळापत्रक?

दिनांक आणि वार वेळ विषय व विषय सांकेतांक
गुरुवार २९ एप्रील २०२१सकाळी १०.३० ते दुपारी १.३०प्रथम भाषा (०१-मराठी)
मंगळवार ०४ मे २०२१सकाळी १०.३० ते दुपारी १.३०द्वितीय व तृतीय भाषा (१५-हिंदी)
गुरुवार ०६ मे २०२१सकाळी १०.३० ते दुपारी १.३०प्रथम भाषा (०३-ईंग्रजी)
शनिवार ०८ मे २०२१सकाळी १०.३० ते दुपारी १.३०गणित भाग १ (बीजगणित)
सोमवार १० मे २०२१ सकाळी १०.३० ते दुपारी १.३०गणित भाग १ (भुमिती)
बुधवार १२ मे २०२१सकाळी १०.३० ते दुपारी १.३०विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १
शनिवार १५ मे २०२१ सकाळी १०.३० ते दुपारी १.३०विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २
सोमवार १७ मे २०२१सकाळी १०.३० ते दुपारी १.३०सामाजिक शास्त्र भाग १ (ईतिहास व राज्यशास्त्र)
बुधवार १९ मे २०२१सकाळी १०.३० ते दुपारी १.३०सामाजिक शास्त्र भाग २ (भुगोल)

सविस्तर वेळापत्रक पहा इथे…..(NEW)

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *