क्विंटन डिकॉकनी केला फकर झमानचा एप्रिल फुल
दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला १७ धावांनी नमवलं.
परंतु या सामन्यात पाकिस्तानी फलंदाज फकर झमानने ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्याने क्रिकेटवेड्या प्रेक्षकांच मन तृप्त झालं.
त्याने १५५ चेंडूत १९३ धावा फटकावल्या. या खेळीत त्याने १८ चौकार आणि १० षटकार लगावले. त्यांचं द्विशतक केवळ ७ धावांनी हुकलं
आणि त्याला कारणीभूत ठरला दक्षिण आफ्रिकेचा चलाख, चतुर विकेट कीपर क्विंटन डिकॉक.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० ओव्हर्समध्ये आफ्रिकेने ३४१ धावा काढल्या.
पाकिस्तान संघाने निर्धारित ५० ओव्हर्समध्ये ९ विकेट गमावून ३२४ धावा काढल्या. पाकिस्तानला या सामन्यात १७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
दक्षिण आफ्रिकन गोलंदाजवर त्याने ज्या पद्धतीने आक्रमण केलं, ते लाजवाब होतं.
मोठा स्कोअर असताना, लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल आणि तेव्हा आक्रमण कसं असावं, याचा वस्तुपाठ काल फकरने घालून दिला.
त्याने केवळ १५५ चेंडूत १९३ धावा फटकावल्या. या खेळीला त्याने १८ चौकार आणि १० षटकारांचा साज चढवला.
त्यांचं व्दिशतक केवळ ७ धावांनी हुकलं. मैदानात फकर झमानचं वादळ आलं होतं. आफ्रिकन गोलंदाज त्याला आऊट करण्यासाठी जंग जंग पछाडलं.
पण काही केल्या तो आऊट होत नव्हता. फकरने आफ्रिकन गोलंदाजांची डाळ शिजू दिली नाही.
संधी मिळेल तेव्हा तो आक्रमण करत राहिला. १९० धावा पार केल्यानंतर त्याने सावध पवित्रा घेतला. ५० व्या ओव्हर्सच्या पहिल्या चेंडूवर त्याने जोरदार फटका मारला.
एक धाव पूर्ण केल्यानंतर तो दुसऱ्या धावेसाठी पळाला.
जेव्हा तो दुसऱ्या धावेसाठी धावत होता तेव्हा चतुर डिकॉकने फकरला गाफिल ठेवण्यासाठी फिल्डर्सला नॉन स्टायकर एंडला बॉल फेकण्यासाठी सांगितलं.
डिकॉकचा प्लॅन फत्ते झाला. डिकॉकच्या इशाऱ्याकडे फकरने पाहिलं आणि त्यालाही वाटलं आता फिल्डर नॉन स्टायकर एंडला बॉल फेकणार.
पण फिल्डरने डिकॉकच्या दिशेने बॉल फेकला आणि त्या बॉलने बरोबर स्टम्पचा वेध घेतला.
फकरची १९३ धावांची झुंजार इनिंग संपुष्टात आली. डिकॉकची फिल्डिंग कामाला आली.
फकर झमानच्या झुंजार खेळीबद्दल त्याला ‘मॅच ऑफ द मॅच’च्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.
परंतु डिकॉकने आपल्या संघासाठी चतुर खेळी केली खरी पण चाहत्यांना डिकॉकचा चतुरपणा आवडला नाही.
डिकॉकने मॅच स्पिरीट पाळलं नसल्याचा आरोप पाकिस्तानच्या चाहत्यांनी ट्विटरवर केलाय.
डिकॉकच्या विरोधात पाकिस्तानी चाहत्यांनी कित्येक ट्विट केलेत.