स्पोर्ट्स

आयपीएल मध्ये सॉफ्ट सिग्नल बंद

वादग्रस्त सॉफ्ट सिग्नलचा निर्णय आयपीएलमधून हटवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

येत्या आयपीएलच्या १४ व्या हंगामात मैदानी अंपायरला आता सॉफ्ट सिग्नल डिसीजनचा वापर करता येणार नाही.

मैदानी अंपायरकडून सॉफ्ट सिग्नल निर्णय दिला जायचा. भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी ट्वेन्टी मालिकेदरम्यान हा निर्णय वादग्रस्त ठरला.

मैदानी अंपायर्सच्या चुकीमुळे भारताला याचा फटका बसला. कर्णधार विराट कोहलीने या सगळ्या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली.

तसेच अनेक माजी खेळाडूंनीही या निर्णयावर टीका केली होती. आयसीसी अशा नियमांना बदलायला जरा उशीर करते.

परंतु बीसीसीआयने या प्रकरणी एक पाऊल पुढे टाकून आयपीएलच्या १४ व्या हंगामात मैदानी अंपायर सॉफ्ट सिग्नल डिसीजनचा वापर करणार नाहीत.

किंबहुना सॉफ्ट सिग्नल निर्णय हटवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. आता तिसरे अंपायर मैदानातील अंपायरचा नो बॉल आणि शॉर्ट रन निर्णय बदलू शकतील.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या नो बॉल फक्त तिसरे अंपायर पाहायचे, परंतु शॉर्ट रन्ससंबंधीचा निर्णय बदलण्याचा अधिकार थर्ड अंपायरला नाहीय.

काय आहे सॉफ्ट सिग्नल ?

जेव्हा फिल्ड अंपायर  झेलच्या सल्ल्यासाठी तिसऱ्या अंपायर वळतात तेव्हा त्याला सॉफ्ट सिग्नल देखील दर्शविणे आवश्यक असते. फील्ड अंपायर आपला निर्णय देतात आणि थर्ड अंपायरला तो चूक नसल्याचे सुनिश्चित करण्यास सांगतात. आयसीसीच्या नियमांनुसार, सॉफ्ट सिग्नल देखील बद्दला  जाऊ शकतो, परंतु सॉफ्ट सिग्नल चुकीचा असल्याचा पुरावा पाहिजे

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *