सिंधू,श्रीकांत यांची विजयी सलामी, साईना आणि कश्यप पराभूत
स्विस ओपन सुपर ३०० स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज समाधानकारक कामगिरी केली. भारतच्या किदांबी श्रीकांत, अजय जयराम आणि प.वी. सिंधू ह्यांनी एकेरी गटात दुसऱ्या फेरीत प्रवेश केला,परंतु भारताचे पॉवर कपल साईना नेहवाल आणि कश्यपला एकेरी गटात पहिल्याच फेरीत अपयश आले.मिश्र दुहेरीत पोणाप्पा- सात्विक जोडीनं दुसऱ्या मानांकित इंडोनेशियाच्या जोडीला पराभवाचा धक्का दिला.पुरुष एकेरी लढतीत चौथ्या मानांकित श्रीकांतने आपल्याच सहकारी सौरभ वर्मा वर १८-२१,२१-१८,२१-११ असा विजय मिळवला.महिला एकेरीत विश्वविजेती सिंधूने ४२ मिनिटे चाललेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात तुर्कीच्या यिजित नेस्लीहानचा २१-१६, २१-१९ ने पराभव केला.सायनाला थाईलैंडच्या 20 वर्षीय फाइटापाओर्न चिएवन ने १६-२१,२१-१७,२१-२३ असे नमविले.कश्यप स्पेनच्या पाब्लो अबियान विरुद्ध १५-२१,१०-२१ ने पराभूत झाला.
पुरुष दुहेरीत दुसऱ्या मानांकित सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी जोडीनं स्कॉटलंडच्या जोडीवर २१-१८,१९-२१,२१-१६ असा विजय मिळवला. तसेच सत्विकन अश्विनी पोनाप्पासह खेळताना मिश्र दुहेरीत खेळताना दुसऱ्या मानांकित इंडोनेशियाच्या जोडीला २१-१८,२१-१० पराभवाचा धक्का दिला.त्या आधी मिश्र दुहेरीत इंग्लंडच्या जोडीनं भारतच्या प्रणव चोप्रा – सिक्की रेड्डी ला २१-१८,२१-१५ असे नमविले.
स्विस ओपन ही ऑलिम्पिक पात्रतेची पहिली स्पर्धा आहे आणि पात्रता स्पर्धा १५ जूनरोजी संपणार आहे