सिंधूला इतिहास घडवण्याची “सुवर्णसंधी”
ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप
सध्याची वर्ल्ड चॅम्पियन पी.व्ही.सिंधू ही आपल्या स्विस ओपन फायनलच्या पराभवातून सावरून ऑल इंग्लंड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यास उत्सुक असेल.
आज पासून बर्मिगहम येथे ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा बॅडमिंटन ची “विम्बल्डन” म्हणून ओळखली जाते.
ह्या स्पर्धेत भारताच्या कामगिरी वर सर्वांचेच लक्ष असेल. ही स्पर्धा ऑलिम्पिक पात्रता फेरीत ग्राह्य धरली जाणार नसल्यामुळे कोरिया,चीन आणि चायनीज ताईपाई ह्यांनी ह्या
स्पर्धेतून माघार घेतलीये तसेच सिंधूची प्रतिस्पर्धी कॅरोलिना मरीन हिना दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेत आहे. त्यामुळे सिंधूला ही स्पर्धा जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.
सायना नेहवाल सध्या फॉर्ममध्ये नसून ही स्पर्धा फॉर्म सुधारण्याची चांगली संधी आहे.
पुरुष गटात परुपल्ली कश्यप, बी. साईनाथ आणि किदंबी श्रीकांत भारताचे प्रतनिधीत्व करतील. कश्यपचा पहिलाच सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या
जपानच्या के. मोमता शी होणार आहे. ह्या स्पर्धेत भारतीयांना खास यश नाही ,१९८० मध्ये प्रकाश पदुकोण तसेच २००१ मध्ये पूलेला गोपीचंद ह्यांनी ही स्पर्धा जिंकली होती.
२०१५ मध्ये सायनाचा अंतिम फेरीत पराभव झाला होता, तसेच सिंधू ला २०१८ मध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता आली होती.
पी. वी. सिंधूची कारकीर्द
२०१० मध्ये पी.व्ही सिंधूने जागतिक कनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. २०११ मध्ये राष्ट्रकुल युवा क्रीडास्पर्धेत तिने महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकले आणि
त्यानंतर लखनौमधील आशियाई ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी व मिश्रित गटात कांस्यपदक जिंकले. २०१२ मध्ये सिंधूने ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये पात्रता फेरीच्या
माध्यमातून प्रवेश केला परंतु पहिल्या फेरीत ट्झा तु-टिंगकडून पराभव पत्करावा लागला.
जुलैमध्ये तिने दक्षिण कोरियाच्या गिमचेन येथे झालेल्या आशियाई कनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
२०१५ मध्ये मलेशियन ओपन स्पर्धेत सिंधूने पहिले ग्रँड प्रिक्स सुवर्णपदक जिंकले.
त्यावर्षी तिने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भाग घेतला, जिथे तिने कांस्यपदक जिंकले आणि जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीत पदक जिंकणारी ती दुसरी
भारतीय खेळाडू ठरली. २०१६ मध्ये सिंधूने रिओ ऑलिम्पिक मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक जिंकले
ह्या विजयानंतर तिला खरी ओळख मिळाली.
२०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत, ग्लासगोमध्ये महिलांच्या संघात सुवर्ण आणि महिला एकेरीत रौप्यपदक जिंकले.
२०१९ मध्ये सिंधूने बासेल येथील वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये प्रथम बॅडमिंटन चॅम्पियन बनून इतिहास रचला.
२०२१ च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये ती सुवर्णपदक गाठेल हीच सर्व भारतीयांची अपेक्षा.