तांत्रिक कारणांमुळे निफ्टी चे सगळे व्यवहार ठप्प !
निर्देशांकातील तांत्रिक बिघाडामुळे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई ) ने सकाळी ११:४० वाजता सर्व विभागातील व्यवहार थांबवला. लवकरात लवकर समस्येचे निवारण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे एनएसईने सांगितले.बंद होण्याआधी निफ्टी मधे ०.८% ची वाढ दिसली असून तो १४,८२०.४५ वर होता.
“आम्ही यंत्रणेच्या दुरुस्तीवर काम करत आहोत. वरील बाबी लक्षात घेता सर्व विभाग ११:४० वाजता बंद केले गेले आहेत आणि प्रकरण मार्गी लागताच पुनर्संचयित केले जाईल,”एनएसई ने आपल्या अधिकृत ट्विटर वरन सांगितले.
याआधी गुंतवणूकदारांनी सकाळ पासूनच ट्विटर वर निर्देशांकात होणाऱ्या गडबडी वर तक्रार सुरू केली होती.