कोरोना रुग्णाला टरबुजातून पाठविली दारू अन गुटखा;यवतमाळातील घटना
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोरोना उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची तलफ भागविण्यासाठी रुग्णांच्याच नातलगांनी टरबूज फोडून त्याच्या आत गुटका पार्सल पाठविण्याचा प्रकार उघडकीस आला. तर काही नातलगांनी विदेशी मद्यसुद्धा पुरविण्याचा प्रयत्न काल गुरुवारी केला होता. मात्र, वैद्यकीय महाविद्यालयात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षक आणि डॉक्टर यांच्या सतर्कमुळे हा प्रकार उघडकीस आला.
संशयास्पद वाटल्याने टरबूज फोडून बघीतले असता हा प्रकार उघडकीस आला. तर काही नातलगांनी विदेशी मद्यसुद्धा पाठवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शौकिनांची तलप भागवण्याचा रुग्णांच्या नातलगांचा प्रयत्न रुग्णालय प्रशासनाने हाणून पाडला. वैद्यकीय महाविद्यालयात तैनात सुरक्षा रक्षक आणि डॉक्टर यांच्या सतर्कनेने हा प्रकार उघडकीस आला.