इकॉनॉमी

सेबीने दिली पेटिएमच्या यूपीआय हँडलला शेअर मार्केट इंवेस्टमेंटची मान्यता.

पेटीएम पेमेंट्स बँक आता आयपीओसाठी पेमेंट करू शकणार

मार्केट रेग्युलेटर सेबीने सोमवारी पेटीएम पेमेंट्स बँक पेटीएम यूपीआय हँडलला मान्यता दिली. यामुळे पेटिएम आता आयपीओचे पेमेंट सहज करु शकेल.


पेटीएम पेमेंट्स बँक (पीपीबीएल) ने आयपीओ चे पेमेंट भरण्यासाठी पेटीएम मनीबरोबर भागीदारी केली आहे.

पेटीएम मनीने सन २०२२ पर्यंत १ कोटी भारतीयांना जोडण्याचे लक्ष्य

ठेवले आहे.


पेटीएम यूपीआय मार्फत आयपीओसाठी पेमेंट करण्याच्या परवानगीने

आता कोट्यवधी गुंतवणूकदार कोणत्याही अडचणीशिवाय पेमेंट करू शकतील.


पेटीएम पेमेंट्स बँक (पीपीबीएल) चे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश गुप्ता म्हणाले,

“आम्हाला विश्वास आहे की भांडवलाच्या बाजारपेठात प्रवेश करण्याचा आणि यशस्वी

कंपन्यांच्या यादीचा फायदा घेण्याचा प्रत्येक भारतीयांचा अधिकार आहे..तसेच आयपीओसाठी अर्ज करण्यासाठी पेटीएम यूपीआय सक्षम करून आम्ही कोट्यवधी गुंतवणूकदारांना त्यांचे

वित्तीय पोर्टफोलिओ वाढवायला मदत करण्यासाठी सुरक्षित आणि जलद पेमेंट साधन देत आहोत.”


पेटीएमच्या स्टाॅक ब्रोकिंग प्लेटफॉर्मने या वर्षांत अखेरपर्यंत 3.5 लाख डिमेट अकाउंट उघडण्याचे टार्गेट ठेवले आहे तर यापैकी ६०% यूजर्स हे छोट्या शहरातून असतील असा अंदाज लावला आहे.


फायनेंशियल ईयर 2021 पासून देशातील शेअर बाजारात जवळपास २४ आयपीओ तर भांडवली बाजारातून एकूण ४८,४९३ कोटी रुपयांचे उत्पन्न वाढले.

“झोमॅटो, एलआयसी, कल्याण ज्वेलर्स आणि इतर बर्‍याच नवीन ऑफरसाठी रिटेल मार्केट मध्ये अनेक मोठी नावे येण्याची आयपीओ मार्केटची अपेक्षा आहे.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *