सायली कांबळेला गरीब दाखवल्याने ‘इंडियन आयडॉल १२’ वादाच्या भोवऱ्यात
नुकतेच अभिनेते जॅकी श्रॉफ पाहुणे म्हणून इंडियन आयडल 12 च्या मंचावर आले. या भागामध्ये सांगण्यात आले की स्पर्धक सायली कांबळे चौकी सारख्या कॉलनीत राहतात. टीव्ही शो इंडियन आयडल 12 सध्या खूप चर्चेत आहे. तर काही स्पर्धकांवर खोटे बोलल्याचा आरोप देखील केला जात आहे. अलीकडेच हा शो सवाई भट्टबाबत वादात पडला होता, त्यामुळे आता सयाली कांबळेबाबत एक नवा वाद निर्माण झाला आहे.गेल्या काही काळात टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या रिअलिटी स्पर्धांचं प्रमाण कमालीचं वाढलं आहे. विशेष करुन डान्स आणि गाणं या प्रकारातील शो मोठ्या प्रमाणावर दाखवले जातात. या शोमध्ये झळकणारे कलाकार अत्यंत गरीब असतात. या शोनं त्यांना आपली कला सादर करण्याची संधी दिली अन् आता ते सेलिब्रिटी झाले आहेत. अशी पटकथा प्रेक्षकांना जवळपास प्रत्येक शोमध्ये पाहायला मिळते. परंतु इंडियन आयडलमध्ये (Indian Idol 12) घडलेल्या या प्रकारामुळं खरोखरंच ते कलाकार गरीब असतात का? की निव्वर प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी केली जाते? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.इतकंच नाही तर शोमधील स्पर्धकांवर खोटं बोलण्याचे आरोपदेखील केले जात आहेत. आधी सवाई भट आणि आता सायली कांबळेमुळे ‘इंडियन आयडल 12’ चर्चेत आहे. कार्यक्रमात दाखवण्यात आल्याप्रमाणे सायली अत्यंत गरीब घरातून आली असून तिचे वडील रुग्णवाहिका चालक आहेत. त्यांच्या घराची परिस्थिती बेताची असल्याचं तिने सांगतिलं होतं.याआधीही कार्यक्रमाच्या निर्मात्यांवर टीआरपी वाढवण्यासाठी स्पर्धकांना गरीब दाखवण्याचा आरोप करण्यात आला होता.