सौदी मधील क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती $७० प्रति बॅरल ; गेल्या वीस महिन्यातील गाठला उच्चांक
अरामको या सौदी अरेबियातील तेल कंपनीच्या मालकीच्या एका जागेवर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याने कच्च्या तेलाच्या किमती दोन टक्क्यांनी वाढल्या. जागतिक आर्थिक परिस्थिती रुळावर येत असताना तेल कंपन्यांना जरासा दिलासा मिळत होता. सोमवारच्या या घटनेनंतर कच्च्या तेलाच्या किमतीत २. ११ % वाढ झाली असून आता प्रती बॅरल $७०.८२ मोजावे लागणार आहेत. मे २०१९ पासूनचे कच्चा तेलाचे हे सर्वात उच्चांकी दर आहेत.
सहा वर्षांपासून चालत असलेला येमेनच्या हूथी बंडखोरांच्या आणि सौदी अरेबियाच्या तेल उद्योगाच्या संघर्षात या हल्ल्यानंतर नवीन तणाव निर्माण झाले आहेत. साउदी अरेबिया च्या सैन्यदलाने येमेनच्या हूथी चे नियंत्रणात असलेले सना, या येमेनच्या राजधानीवर बॉम्बहल्ले केल्यानंतर हूथीकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हे पलटवार म्हणून वापरण्यात आले.
सौदी संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठे तेल बंदर असलेल्या रस तनुरा येथे पेट्रोलियम साठवण यार्डकडे लक्ष्यित केलेले ड्रोन आणि पूर्व सौदी अरेबियामधील दहरान शहरात अरामकोच्या सुविधांवर लक्ष्य वेधून बॅलिस्टिक क्षेपणास्त्र सोडण्यात आले होते असे त्यांना समजले. या हल्ल्याने कुठल्याही प्रकारची जीवित हानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही.
ओ पी इ सी यांनी गेल्या गुरुवारी आम्ही उत्पादन स्थिर ठेवू असे वक्तव्य केल्यानंतर या हल्ल्यानंतर आता कच्च्या तेलाच्या किमती परत वधारले आहेत. राज्यात आणि देशात कर कपात करून पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती कमी करायचा विचार सुरू असताना जागतिक पातळीवर या किमती प्रचंड वाढ अनुभवत आहेत.