जसप्रीत बुमराह अडकला लग्नबंधनात ;कोण आहे त्यांची पत्नी संजना ?
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सोमवारी (१५ मार्च) लग्नबंधनात अडकला. टीव्ही अँकर संजना गणेशनशी त्याने लग्नगाठ बांधली अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत गोव्यात हा लग्नसोहळा पार पडला जसप्रीत आणि संजना यांचे कौटुंबिक आणि जवळचे मित्रमैत्रीण या सोहळ्याला उपस्थित होते. तिच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती. भारत -इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीच्या आधी त्याने बीसीसीआयकडे रजा मागितली होती .त्याच्या काही दिवसानंतरच जसप्रीतच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला होता. आता जसप्रीत आणि संजना लग्न सोहळ्याचे फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांकडून या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कोण आहे संजना गणेशन?
सोशल मीडिया अकाउंटवरील बायोमध्ये संजनाने स्वतःविषयी लिहिलं ,’स्टार स्पोटर्स इंडियासाठी टीव्ही प्रेझेंटर, डिजिटल होस्ट ,मिस इंडिया गर्ल.’ संजनाने स्टार स्पोटर्स वरील अनेक स्पोटर्स शोचं सूत्रसंचालन केला आहे. क्रिकेट वर्ल्ड कप 2019 दरम्यान ‘मॅच पॉईंट’ आणि ‘चिकी सिंगल्स’ या शोचं निवेदनही तीने केलं होतं. संजनाने मॉडेल म्हणून करियरची सुरुवात केली. तिने फेमिना मिस इंडिया पुणे सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता आणि अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती.
२०१४ मध्ये संजनाने एम टीव्ही स्प्लिट्सविलाच्या सातव्या सिझनमध्ये भाग घेतला होता. सनी लियोनी आणि निखिल चीनाप्पाने या शोचं सूत्रसंचालन केलं होतं. मात्र दुखापतीमुळे तिने या शोमधून माघार घेतली होती. संजनाने प्रीमियर बॅडमिंटन लीग ( PBL) आणि स्टार स्पोर्टच्या ‘दिल से इंडिया’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे .शाहरुख खानच्या आयपीएल टीम कोलकत्ता नाइट रायडर्सच्या ‘ द नाईट क्लब’ या इंटरॅक्टिव्ह शोसाठी ही ती अँकर होती.

कोण आहे जसप्रीत बुमराह?
जसप्रीत बुमराह हा भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज आहे. ६ डिसेंबर १९९७ रोजी जन्मलेला बुमराह मुळचा गुजरातच्या अहमदाबादचा आहे. २३ जानेवारी २०१६ रोजी त्याने भारतीय क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले. भारताकडून त्याने आजवर १९ कसोटी, ६७ एकदिवसीय आणि ४९ टी-२० सामने खेळले आहेत. या सर्व प्रकारांमध्ये त्याने आजवर तब्बल २५० विकेट घेतल्या आहेत. आपल्या अचूक यॉर्करच्या शैलीमुळे त्याने जागतिक क्रमवारीत थेट दुसऱ्या स्थानापर्यंत मजल मारलेली आहे. शिवाय, वेग आणि अचुकता याचा अत्यंत योग्य मेळ साधत त्याने आजवर जगभरातील दिग्गज फलंदाजांना बाद केले आहे.
