साईना नेहवाल बायोपिकच्या पोस्टर वर नेटिझन्सची नाराजी.
भारताची ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती साईना नेहवाल हीच्या बायोपिकचा पहिलं पोस्टर आणि टीजर मंगळवारी रिलीज झालं. ‘सायना’ या नावानं तयार होत असलेल्या चित्रपटात परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण, सायनाच्या चित्रपटाच्या पहिल्याच पोस्टरनं वादाची सर्व्हीस केली आहे. सायनाच्या बायोपिकसाठी काम करणाऱ्या रिसर्च, बेसिक माहिती आणि फॅक्टशी जोडलेल्या लोकांवर टीका होत आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सर्व्हिस करण्यापूर्वीच्या बॅडमिंटन शटलमध्ये सायनाचं नाव लिहिलेलं पाहायला मिळत आहे. पण, क्रिएटीव्ह टीमनं मोठी चूक केली आहे आणि बॅडमिंटनमध्ये सर्व्हीस करताना शटल वर उंचावलेलं दाखवलं आहे. मात्र, बॅडमिंटनची सर्व्हीस अशी होत नाही आणि पोस्टरमध्ये दाखवलेली सर्व्हीस टेनिसमध्ये होते.टेनिस आणि बॅडमिंटन यातील सर्व्हीस करण्याची पद्धत वेगवेगळी असते. ह्या सिनेमाच्या निर्मात्यांनी मूलभूत त्रुटी केल्याने ट्विटर वर नेटिझन्सनी संताप व्यक्त केला. परिणीती चोप्रा हिच्या आधी श्रद्धा कपूर हीची निवड केली होती मात्र वेळेच्या अभावामुळे तिच्या जागी परिणीती चोप्राची निवड करण्यात आली होती.