सचिन तेंडुलकरला कोरोना
देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट धोकादायक असल्याचा अहवाल एसबीआयने नुकताच दिला आहे.
या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रातील अभिनेते, दिग्गज नेते यांना कोरोनाची लागण झाली आहे.
यातच आज संपूर्ण क्रिकेटविश्वासाठी मोठी बातमी आहे. क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली आहे.
सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती दिली. “मला सौम्य लक्षणे आढळली असून, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
मी काळजी घेत आहे. सर्वांनी काळजी घ्या” असं सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे. तसेच सचिनच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीदेखील कोरोना चाचणी केली
असून सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये खेळला होता. या स्पर्धेत सचिनच्या नेतृत्वाखाली भारतीय संंघाने
अंतिम सामन्यात श्रीलंकाचा पराभव करत विजेतेपद मिळवले होते. रोड सेफ्टी मालिकेत सचिन शिवाय
विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, ब्रायन लारा, केव्हिन पिटरसन, सनथ जयसूर्या, तिलकरत्ने दिलशान आदी दिग्गज खेळाडू खेळले होते.
सचिनने या स्पर्धेतील सात सामन्यात २२३ धावा केल्या होत्या.६५ ही त्याची सर्वोच्च खेळी होती.