रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ९ पोषकतत्वे!
कोरोनासारख्या आजाराला हरवण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती खुप आवश्यक असते, तर ह्यासाठी हे सत्वे उपायोगी ठरतात.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ९ पोषकतत्वांची गरज असते. भरपुर फळे, भाज्या, ताक, साबुक धान्य डाळींतून रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
जाणुन घेऊया सविस्तर माहिती
१) प्रोटिन्स
शरीरासाठी हा सर्वात महत्वाचा घटक आहे. आपले ५० टक्के शरीर यांचेच बनलेले आहे.
सफेद रत्कतण, अँटीबोडीच्या उत्पत्तीसाठीही प्रोटिन्सची गरज असते. म्हणुन रोजच्या आहारात, नाश्त्यात भरपूर प्रकारची प्रोटिन्स हवीत.
२) कॅल्शियम
शरीरातील महत्वाच्या घटना, अनेक जीवरासायनिक क्रिया सुरळीतपणे पार पाडण्यास मदत करते.
रक्ताला विशिष्ट घनरुप प्रात्प करुन देणे, स्नायूंचे काम सुरळीतपणे चालू ठेवणे, त्यांचे आकुंचन –प्रसरण पावणे, हार्मोन्सची कार्ये पार पाडणे,
पेशींमधुनआत जाणाऱ्या, बाहेर पडणाऱ्या घटकांवर इतर अन्नघटकांच्या सहाय्याने नियंत्रण ठेवणे, एन्झाइम्सना कार्यक्षम ठेवणे ही कामे कॅल्शियममुळे सुरळीत होतात.
हे सर्वच इम्यून सिस्टमच्या पेशींसाठीदेखील आवश्यक आहे. कॅल्शियम दुध आमि तत्सम पदार्थात, वाचणी, खसखस, तीळ यातून प्राप्त होते.
तसेच खाण्याच्या चुन्यातूनही मिळते. हा मऊ चूना भातात शिजताना इडली वाफवताना ताकातकणिक भिजवताना घालावा.
३) जीवनसत्व अ
हे इम्यून सिस्टीमच्या पेशींना उद्दीपात करुन अँटीबॉडीद्वारा किटाणूंना नीष्प्रभ करते. याशिवाय प्रोटिन्स शरीरात कार्य करू शकत नाहीत.
हे लाल भोपळा,गाजर,पपई, आंबा,फळे,रताळे, हिरव्या, पालेभाज्या,अंडी,दूध, मासे यात असते.
४) फोलिक अँसिड
हे एक ‘ब जीवनसत्व’ आहे. ते इम्यून सिस्टीमच्या पांढऱ्या रक्तकणातील मॅक्रोफेडेस बनायला आवश्यक असते, हेमॅक्रोफेजेस बनायला आवश्यक असते.
हे मॅक्रफेजेस हल्ला करणाऱ्या जीवजंतूंना नष्ट करतात. हे जीवनसत्व सर्व हिरव्या पालेभाज्या, हरभरा,अंडी यात भरून असते.
५) जीवनासत्व ‘ब’
सफेद रक्तकणांना या ‘ब’ जीवनसत्वाची गरज असते. त्याच्या सहाय्यानेच अँटीबॉडीज तयार होतात. सफेद रक्तकणही अधिक बनायला मदत होते.
राजमा, केळी यात हे जीवनसत्व असते.
६) जीवनसत्व ‘क’
याच्या सेवनाने सर्दी खोकला कमी होऊ शकतो. यामूळे शरीरात इंटरफेरॅन बनायला मदत होते. हे इंटरफेरोन व्हायरसच्या वाढीवर नियंत्रण आणते.
तसेच अनावश्क पेशांची वाढही थांबवते. भाज्या, सलाद, आवळा, लिंबु, लिंबु वर्गांची फळे, देशीगुलाबाच्या पाकळ्यात हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते.
७)जीवनसत्व ‘इ’
वयोवर्धबरोबर आपल्या रोगप्रतिकारशक्ती यंत्रणेला जे हार्मोन नष्ट करते. त्याला हे जीवनसत्व नेस्तनाबूत करते.
गव्हाकूरात हे सर्वाधिक असते. तेलब्या, घाणीचे तेल, हिरव्या पालेभाज्या, अंकुरित कडधान्यात, विड्याच्या पानात हे भरपूर असते.
८) लोह
लाल तसेच रक्तकण बनायला लोह मदत करते. याच्या कमतरतेमुळे विषाणु, बिट, जोडीकला लिंबू, लोखंडी कढई, तवे, वापरण्यातून हे जीवनसत्व मिळते.
९) झिंक
हे क्षार शयरस अँटीजेला प्रतिकार करते. हे लाल भोपळा, खरबूज, टरबुज, सर्व साबूत धान्य, कडधान्य यात भरपूर असते.
या सर्व नऊ घटकांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.
वैश्नवी नाईक