पंचाच्या एका चुकीच्या निर्णयाने घेतला खेळाडूचा जीव
भारताच्या स्टार खेळाडू गीता, बबिता, रितू, संगीता आणि विनेश फोगाट ह्याची चुलत बहीण आणि उदायन्मुख कुस्तीपटू रितिका फोगाट ने हरियाणाच्या बलाली गावात आत्महत्या केली. १७ वर्षीय रितिका न (सोमवारी) रात्री अकराच्या सुमारास हे तीव्र पाऊल उचलले. हरियाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितिकाने तिचे काका द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त महावीर फोगट यांच्या घरी छताच्या पंख्याला गळफास लावून स्वत: चा जीव घेतला. राज्यस्तरीय कनिष्ठ कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत एका गुण नी पराभूत झाल्याने रितिकाने नाराज होऊन हे पाऊल उचलले अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली. राजस्थानमधील भरतपूर येथील लोहागड स्टेडियमवर १२ ते १४ मार्च दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महावीर फोगट रितिकासमवेत भरतपूरला गेले होते व तिच्याबरोबर बलाली येथे परत आले होते.“जेव्हा ती परत आली, तेव्हा पराभवामुळे ती खूप नाराज झाली. कुस्तीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बहिणी असल्यास, अशीच कीर्ती मिळवण्याचा दबाव एखाद्याला वाटू शकतो, ”असे कुटुंबातील एका सदस्याने सांगितले. “माझ्या कुटुंबासाठी हा अत्यंत दु: खद क्षण आहे. रितिका एक प्रतिभावान कुस्तीपटू होती आणि तिने असे पाऊल का घेतले मला माहित नाही. विजय आणि पराभव हे एखाद्या अॅथलीटच्या जीवनाचा एक भाग आहे. राष्ट्रीय शिबिरात प्रशिक्षण घेत आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी तयारी करीत असलेल्या गीताने ट्विट केले. “ आत्महत्या हा उपाय नाही. पराभव आणि विजय दोन्ही जीवनातील महत्त्वपूर्ण बाबी आहेत. पराभूत करणारा देखील एक दिवस जिंकतो. संघर्ष ही यशाची गुरुकिल्ली आहे, जीवनाच्या संघर्षाला घाबरून असे कोणतेही पाऊल उचलले जाऊ नये, असे बबिता म्हणाली. रितिकाचे मेहुणे (संगीता फोगट यांचे पती) आणि स्टार भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनीही त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.
रितिकाच्या आयुष्य संपविण्याच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा खेळाडूंच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न उभा झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावर सतत वादंग सुरू आहेत. विराट कोहली, सारा टेलर, ग्लेन मॅक्सवेल यासारख्या स्टार क्रिकेटरसह बर्याच खेळाडूंनी मुक्तपणे मानसिक संघर्षांवर प्रकाश टाकला. मानसिक आरोग्य हा एक महत्त्वाचा घटक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंना आहे.
आत्महत्या करणे हा उपाय नाही आणि खेळाडूंना वेळोवेळी समुपदेशनाची आवश्यकता असते. अशा वेळी, जेव्हा जग नवीन आव्हानांना सामोरे जात आहे, तेव्हा त्यांच्या पालकांनी आणि प्रशिक्षकांनी, विशेषत: पराभवानंतर तरुणांना प्रेरणा देणे हे त्यांचे कर्तव्य आहे.