स्पोर्ट्स

रिषभ पंत बनला दिल्ली कॅपिटलचा नवा कर्णधार

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीनही सीरिजमध्ये धडाकेबाज कामगिरी बजावणाऱ्या रिषभ पंतला सर्वात मोठी लॉटरी लागली आहे. रिषभ पंतने इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये भारतीय संघासाठी मोलाची कामगिरी करुन दाखवली. त्याच्या याच मेहनतीचं फळ आता त्याला मिळालं आहेत. रिषभ पंतची दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रिषभ सध्या फॉर्ममध्ये आहे. रिषभच्या क्रिकेट कारकिर्दीतील ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. तो आयपीएलमध्येही असाच फॉर्ममध्ये राहिला तर दिल्ली कॅपिटल्सला आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या ट्रॉफीसाठी दिल्ली दूर नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.आयपीएलच्या 14 व्या मोसमाला येत्या 9 एप्रिल पासून सुरु होणार आहे. या मोसमासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज खेळाडू आणि कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या ऐवजी रिषभ पंतवर संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने याबाबतची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी मोसमात रिषभ पंत आता दिल्लीच्या संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे.“रिषभ पंतमध्ये भरपूर क्षमता आहे. तो संघाचं नेतृत्व करु शकतो. श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्याने आम्ही रिषभवर संघाच्या नेतृत्वाची जाबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे”, असं रिकी पॉन्टिंगने सांगितलं.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *