महिलांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घर आणि मुलं सांभाळणे-तिरथसिंग रावत
रिप्पड् जीन्समुळे चर्चेत आलेले उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री यांचे विधान.
नवनियुक्त झालेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथसिंग रावत यांनी मंगळवारी ‘ज्या महिला रिप्पड् जीन्स घालतात त्या त्यांच्या मुलांना घरात पोषक वातावरण देऊ शकत नाही’ असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. देहरादून येथे झालेल्या उत्तराखंड कमिशनच्या ‘लहान मुलांचे संरक्षण आणि हक्क’ या कार्यशाळेेेत त्यांनी हे वादग्रस्त विधान केेेेले.
रावत यांनी एका महिलेची आणि त्यांची फ्लाईटमध्ये घडलेली घटना सांगितली त्यात त्यांनी “ती तिच्या दोन मुलांसोबत फ्लाईटमध्ये बसली होती आणि तिने रिप्पड जीन्स घातली होती. तिने सांगितले कि ती एक एनजिओ चालवते. रिप्पड जीन्समुळे तिचे गुडघे दिसत होते तेव्हा मी विचार केला कि एनजिओ मध्ये काम करत असूनही ती असे कपडे परिधान करत असेल तर ती तिच्या मुलांना काय संस्कार देईल? यातून आपण समाजाला आणि आपल्या मुलांना काय संस्कार देतोय”. ‘केंची से संस्कार’ अशा शब्दप्रयोगाचा त्यांनी वापर केला. रावत यांनी दावा केला की महिलांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घर आणि मुलं सांभाळणे.
त्यांच्या या वक्तव्यावर संपुर्ण देशातूूून खूप टीका होत असुन ट्विटरवर रिप्पड जीन्स असा हॅशटॅग ट्रेंड होतोय. बऱ्याच बॉलीवुड सेलिब्रिटी आणि राजकारणी नेत्यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली.
गुल पनाग यांनी आपल्या ट्विटर हँडलवर तिच्या मुलीसोबत फोटो शेअर केला. ज्यात त्यांनी रिप्पड जीन्स घातली असून रिप्पड जीन्स असा हॅशटॅग ठेवला.
अमिताभ बच्चन यांची नव्या नवेली नंदा हिनेही ट्विटरवर तीव्र प्रतिक्रिया दिली.नव्याने तिच्या सोशल-मीडिया अकाउंटवर लिहिले ‘आमचे कपडे बदलण्याआधी तुमचे विचार बदला‘.
इथे एकच आश्चर्यजनक गोष्ट आहे ते म्हणजे तुमच्या विधानांमुळे समाजाला जाणारा संदेश.’त्यांनी देशातल्या सर्व महिलांची माफी मागावी अशी मागणी शिवसेनेचे खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली याच्या आधीही बऱ्याच राजकीय नेत्यांनी महिलांबाबतीत असे वादग्रस्त विधान केलेले आहे