बंजारा समाजाची वेशभूषा केल्याने रिंकू राजगुरू पुन्हा एकदा चर्चेत.
बंजारा समाजाची वेशभूषा केल्याने रिंकू राजगुरू पुन्हा एकदा चर्चेत.
सैराट चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे. मराठी चित्रपटामध्ये ती एक प्रसिद्ध चेहरा आहे. तिच्या अभिनयाचे नेहमी प्रेक्षक कौतुक करतात. सैराट चित्रपट हा दाक्षिणात्य सिनेमा इंडस्ट्रीमध्येपण चर्चेत आलेला आहे. मागे एका इंटरह्यूमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा सांगतो की, माझा आवडता चित्रपट सैराट आहे.
कार्यक्रमात आर्चीला (रिंकू) बघण्यासाठी प्रेक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. त्या ठिकाणी बंजारा समाजाच्या विविध वेशभूषा करून लोक आलेले होते. त्या ठिकाणी रिंकू पाहुनी म्हणून हजर झाली होती. रींकुने बंजारा समाजाचे विविध प्रकारचे कपडे घातले होते. त्यावर तीने फोटोशूट केले. ते फोटो इंस्टाग्राम पोस्ट करताच, लाईक, कमेंटचा वर्षाव सुरु झाला.
आर्चीने तेथे एक सैराट मधील डायलॉग म्हटले होता. मराठीत कळत नाही का बंजारात सांगू, अशा तो डायलॉग होता. त्यामूळे आर्चिने प्रेक्षकांची मने पुन्हा एकदा जिंकली आहे. ती लवकरच झुंड या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.