इकॉनॉमी

आर्थिक स्थिरतेवर क्रिप्टो करेंसी चा परिणाम चिंताजनक: शक्तिकांत दास

जान्हवी दैठणकर :

बुधवारी भारतीय रिझर्व बँकचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी क्रिप्टो करन्सीचा आर्थिक स्थिरतेवर होणारा परिणाम चिंताजनक वाटतो आहे असे वक्तव्य केले. हे विचार त्यांनी सरकार पर्यंत देखील पोचवले आहेत. 
एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत “आम्हाला क्रिप्टोकरन्सींबद्दल काही प्रमुख चिंता आहेत. आम्ही त्या सरकारला कळविल्या आहेत . हा विषय सरकारकडे विचाराधीन आहे आणि मी अपेक्षा करतो की लवकरच यावर निर्णय घेतला जाईल आणि आवश्यक असल्यास संसदेत देखील यावर विचार केला जाईल ” असे ते म्हणाले.
याच विषयावर बोलताना” ब्लॉकचेन” हा वेगळा मुद्दा असून त्याचे अनेक फायदे अर्थव्यवस्थेला होऊ शकतात परंतु क्रिप्टो करेंसी बद्दल खात्री वाटत नाही हे त्यांनी स्पष्ट केले. दास यांनी सांगितले नसले तरी काही दिवसांपूर्वी सेंट्रल बँकनि चिंता व्यक्त केली होती कीअशा प्रकारचे डिजिटल चलन अवैध सावकारी आणि टेरर फंडिंग साठी वापरला जाऊ शकते.
या सर्वाचा विचार करत संसदेमध्ये कंपन्या आणि व्यक्तिगत व्यवहारात क्रिप्टो करेंसी चा वापर होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक विधेयक केंद्र सरकार सादर करण्याच्या विचारात आहे. याच्यासोबत एका अधिकृत डिजिटल चलनाची रचना देखील सरकार करणार आहे.
“सेन्ट्रल बँकचे डिजिटल करन्सी वर काम सुरू आहे. आरबीआय सध्या तांत्रिक आणि प्रक्रियात्मक पैलूंवर काम करत असून ते ते चलन बाजारात कसे आणता येईल याची तयारी करत आहे.” असेदेखील शक्तिकांत दास यांनी सांगितले.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *