राष्ट्रीय लसीकरण दिवस
आज राष्ट्रीय लसीकरण दिवस आहे. १६ मार्च १९५५ रोजी पहिली पोलिओ लस दिली गेली होती. लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी हा दिवस साजरा करतात.
या दिवशी करोडो मुलांचे पोलिओ लसीकरण केले जाते.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने १९८८ पोलिओ निर्मूलन असा ठराव केल्यानंतर १९५५ पासून सरकारने पोलिओ लसीकरण योजना सुरू केली.
ज्यात पाच वर्षाखालील सगळ्या मुलांना पोलिओ लस दिली जाते. पल्स पोलिओ लसीकरणाचे काही उद्दिष्टे होती.
देशातल्या एकाही बाळाने लस घ्यायचे चुकू नये. ज्या ठिकाणी पोलिओ नाहीसा झाला आहे तिथे तो परत येऊ नये याची काळजी घेणे.
देशभरात पोलिओ लसीकरण बूथ उभारणे. दरवर्षी १६ मार्चला देशभरातल्या पाच वर्षाखालील मुलांना पोलिओ लसीकरण दिले जाते.
दोन प्रकारच्या पोलिओ लस आहेत आयपीव्ही आणि ओपीव्ही.
यातील ओपीव्ही लस दरवर्षी मुलांना दिली गेली आहे. टीव्ही,वृत्तपत्र,जाहिरात या माध्यमातून या योजनेची लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.
१) राष्ट्रीय लसीकरण दिवस का साजरा करतात ?
पल्स पोलिओ आजाराचे देशातून पूर्णपणे निर्मूलन व्हावे आणि हा देश पोलिओमुक्त व्हावा या उद्देशांनी सरकारने पोलिओ मुक्त अभियान सुरू केले.
लसीकरण या घातक आजारांवर मात करण्यासाठीच सगळ्यात प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे सरकारकडून पोलिओ लस निशुल्क करण्यात आली होती.
अमिताभ बच्चनची ‘दो बूँद जिंदगीके’ ही जाहिरात त्यावेळी खूप गाजली होती.पोलिओ निर्मूलन करणे हे खूप मोठे आव्हान होते.
देशाची लोकसंख्या, हवामान,गरीबी आणि त्यामुळे उद्भवणारी कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती हे अडथळे पार पाडणे कठीण काम होते.
पण तरीही २००९ पर्यंत देशातील ६० टक्के पोलिओ केसेस नाहीसे झाले.२०११ पासून एकही पोलिओ केस देशात सापडला नाही.
शेवटची पोलिओ केस १३ जानेवारी २०११ मध्ये गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये आढळली. २०१४ मध्ये भारताला अधिकृतपणे पोलिओमुक्त घोषित करण्यात आले.
जागतिक आरोग्य सघटनेने दिलेल्या अहवालानुसार भारताचे नाव जगभरातील ११ पोलिओमुक्त देशांमध्ये सामील करण्यात आले आहे.
सध्या आपला देशच नाही तर अख्खे जग कोरोनाव्हायरसशी लढत आहे.
भारतात पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोवॅक्सिन ही कोरोना वायरसची लस तयार करण्यात आली.
कोवॅक्सिन ही मेलेल्या व्हायरस पासून तयार करण्यात आलेली असल्यामुळे जेव्हा ती मानवी शरीरात जाईल तेव्हा शरीरातील रोग प्रतिकारक पेशी त्याच्यापासून प्रतिपिंडे
तयार करतील जे कोरोनाव्हायरस विरोधात लढतील.
या वॅक्सिनचे दोन डोस २ ते ४ आठवड्यांच्या अंतराने दिली जातील कोरोना वायरसच्या वॅक्सिन लसीकरण जानेवारी २०१९ पासून सुरू झाले आहे.
आतापर्यंत तीन करोड कामगारांची लसीकरण झाले असून ४५ ते ६० वर्षांमधील लोकांचे लसीकरण सुरू आहे.
भारत जसा पोलिओमुक्त झाला तसाच कोरोना मुक्त होईल का? हा प्रश्नच आता सगळ्यांच्या मनात आहे.