रायगडावर उत्खननातील दुर्मिळ भांडी व नाणी
रायगड हा किल्ला संपूर्ण देशाचा अभिमान आहे. गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांसाठी रायगड किल्ल्यावर उत्खनन सुरू आहे. या जमिनीवर यांत्रिक साधनांचा वापर करून उत्खनन केले जात आहे. या उत्खननात अनेक दुर्मिळ व प्राचीन वस्तू सापडत असून रायगड प्राधिकरणामार्फत दुर्गराज रायगडावर सुरू असलेल्या उत्खननाचे महत्त्व आज पुन्हा प्रत्ययास आले आहे. कारण येथे उत्खनन सुरू असताना पुरातन काळातील बांगडी या ठिकाणी आढळून आलेली आहे.
हे उत्खनन सुरू असताना अनेक प्रकारची भांडी , नाणी, घरांची वेगवेगळ्या प्रकारची कळवण अशा वस्तू पुरातन व विभागाला मिळालेल्या आहेत. सोन्याच्या धातू पासून बनलेली पुरातन मौल्यवान बांगडी ही दोन दिवसांपूर्वी झालेल्या उत्खननांमध्ये सापडलेली आहे. खासदार संभाजीराजे यांनी आनंद व्यक्त करत या संदर्भात पत्रकारांना माहिती दिली आहे. त्यांनी बांगडीचे फोटो काढून आपल्या फेसबुक वर शेअर केलेले आहेत. रायगड आधी दुर्गराज रायगड वर सुरू असलेल्या उत्खननाचे महत्त्व आजही दिसून येते. खासदार संभाजीराजे यांनी अशी माहिती दिली. यापुढेही अशा प्रकारे अनेक ऐतिहासिक वस्तू वेगवेगळ्या आलंकारिक उत्खननात मिळू शकतात. त्यामुळे गडावरील तत्कालीन राहणीमान संस्कृती वस्तू रचना नव्याने समजण्यास मदत होणार आहे. त्यावरून त्या ठिकाणी अशा पुरातन वस्तू सापडल्यामुळे त्या जागेचं वास्तविक महत्त्व माहिती समजण्यास मोलाची मदत होणार आहे.सध्या गडावर सुरू असलेले उत्खनन भारतीय पुरातत्त्व खात्याच्या वतीने चालू आहे. या उत्खननात या वस्तू मिळालेल्या आहेत. या प्रसंगी पुरातत्व खात्याचे विशेष कौतुक करावे असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.