शेतकऱ्यांच्या समस्यांवर येणार चित्रपट
दिल्ली6 , रंग दे बसंती, सारखे चित्रपट बनवणारे, बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहेरा लवकरच नविन चित्रपट तयार करणार आहे. सर्वोत्कृष्ट निर्माता म्हणून त्यांना ओळखले जाते. लवकरच ते चालू विषयावर चित्रपट तयार करणार आहेत. यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. एक मुलाखती वेळी लेखक कमलेश पांडे यांनी या चित्रपटाच्या स्क्रिप्ट वर काम सुरू असल्याचं सांगितलं.
त्याचबरोबर या चित्रपटावर बऱ्याच दिवसापासून काम सुरू आहे. या चित्रपटाची मूळ कहाणी ही शेतकऱ्यांभोवती फिरते शेतकऱ्यांचे प्रश्न , त्यांच्या नेमक्या समस्या, त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते यावर प्रकाश टाकला आहे असं त्यांनी सांगितलं.
‘देशात शेतकरी आंदोलन सुरू आहे. आम्ही 4 वर्षांपासून हा चित्रपट बनवत आहे. जर निर्मात्याने ठरवले तर आम्ही दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा संदर्भ सुद्धा यामध्ये जोडू शकतो. त्याचबरोबर दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर हा चित्रपट बनू शकतो’ असं लेखक कमलेश पांडे म्हणाले.