…म्हणून DMK काँग्रेस ला जास्त जागा देण्यास तयार नाही.
26 फेब्रुवारीला केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. यामध्ये तामिळनाडू,पश्चिम बंगाल, आसाम,केरळ आणि पुडुचेरी हे राज्य आहेत. निवडणुकीची तारीख जाहीर होताच या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली. निवडणुका जाहीर झालेल्या पाच राज्यांपैकी तामिळनाडू, पश्चिम बंगाल व केरळ ही तीन महत्त्वाची राज्य आहेत आणि या तीनही राज्यांमध्ये राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अपेक्षित अशी कामगिरी करता आलेली नव्हती.यामध्ये तामिळनाडूमध्ये AIDMK व भारतीय जनता पक्ष तर डीएमके आणि काँग्रेस यांच्यामध्ये लढत होणार आहे. निवडणूक कोणता पक्ष किती जागा लढवणार यांमध्ये नेहमीच कुजबूज सुरू असते. AIDMK हा जयललिता च्या निधनानंतर तर डीएमके हा करुणानिधींचा निधनानंतर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. या विधानसभा निवडणुकीची धुरा करुणानिधी यांचे पुत्र सांभाळणार आहेत. तामिळनाडू विधानसभा मध्ये एकूण 234 जागा आहेत यापैकी 180 जागा डी एम के लढवणार असून उर्वरित 54 जागा इतर मित्रपक्षांना देण्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. परंतु काँग्रेसला 30 जागा मिळाव्या अशी मागणी काँग्रेस ने केली आहे. VCK, सी पी आय म) व IUML यांनी सुद्धा प्रत्येकी दहा जागांची मागणी केली आहे. परंतु डीएमके काँग्रेसला फक्त 18 जागा देण्यास तयार आहे. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत 188 जागा लढवून एकही जागेवर निवडून न येणाऱ्या भाजपला AIDMK 20 जागा दिल्या आहेत. काँग्रेस पक्षाने 41 जागा लढून आठ जागा जिंकल्या तरीसुद्धा त्यांना वीज जागेसाठी डीएमके सोबत तडजोड करावी लागत आहे यामुळे काँग्रेसच्या स्वाभिमानाला फटका बसलेला आहे. परंतु डीएमके च्या निवडणुकीच्या राजनीती आखणार यांच्या मते जर डीएमके स्वबळावर बहुमत मिळू शकली नाही तर त्याना काँग्रेस किंवा त्यांच्या मित्र पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा आव्हान असेल तसेच गेल्या काही घटनांचा आढावा घेत AIDMK व बीजेपी काँग्रेसचे आमदार फोडतील व त्यामुळे DMK ला सत्तास्थापनेत अडचणी येऊ शकतात म्हणून डीएमके स्वतःच्या बळावर बहुमत मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे आणि यासाठी डीएमके ला कमीत कमी 180 जागा लढवल्या लागतील.