काँग्रेस नेते राहुल गांधींना करोनाची लागण
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना करोनाची लागण झाली आहे. राहुल गांधी यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली. सौम्य लक्षणं आढळल्यानंतर चाचणी केली असता करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. राहुल गांधी यांनी यावेळी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यास सांगितलं आहे. नुकतंच राहुल गांधी यांनी करोनाचा कहर वाढत असल्याने पश्चिम बंगालमधील आपल्या सर्व सभा रद्द करत असल्याची घोषणा केली होती.