रहस्यमय थ्रिलर: उद्योगपती,कार,मृत्यु आणि पोलिस…
काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटीन असलेली एसयूव्ही गाडी आढळली होती. या प्रकरणाशी पोलीस अधिकारी सचिन वाझे याचे काही संबंध आहेत का? की,हा केवळ एक योगायोग आहे,असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला.एसयूव्हीचे मालक मनसुख हिरेन यांचा ५ मार्च रोजी संशयास्पद मृत्यू झाला आणि यामुळेच देवेंद्र फडणवीसांनी सचिन वझेवर गंभीर आरोप केले.देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेले प्रश्न; १) पहिल्या दिवशी जेव्हा गाडी सापडली तेव्हा त्यावेळी लोकल पोलिसाच्या आधी सचिन वझे कसे काय पोहचले ? ती धमकी ची चिठ्ठी त्यांनाच कशी मिळाली ?
२) सचिन वाझे यांचे घर ठाण्यात आहे तर, चोरी झालेली गाडी ठाण्यातली गाडी मालक हि ठाण्यातले इतकंच नाही, तर जी गाडी चोरी होऊन ज्या रूटने आली आणि तिथे पार्क झाली तिच्यासोबत एक इनोव्हा ठाण्यातूनच आली एक पार्क झाली एक निघून गेली आणि त्यातच सचिन वझे यांचीच तपास अधिकारी म्हणून निवड होते. हा केवळ योगायोग समजावा का? त्याहून हि धक्कादायक बाब म्हणजे कॉल रेकॉर्डस् नुसार सचिन वझेचे या गाडी मालकाशी २०२० जून – जुलै संभाषण झाले होते. मृत मनसुख हिरेन यांची गाडी चोरीला गेल्यांनतर ओला कॅबद्वारे ते क्रॉफेड मार्केडला आले होते.तिथे ते एका व्यक्तीला भेटले होते, तो व्यक्ती कोण होता? हे या प्रकरणाचे मूळ आहे.याचा अद्यापही तपास लागलेला नाही.या केसमधल्या इतक्या महत्वाच्या साक्षीदाराचा असा मृतदेह मिळणं संशयशापद आहे आणि हि केस एनआयएकडे सुपूर्त करण्यात यावी ही मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.हिरेन यांच्या मृतदेहाचे हाथ बांधलेले होते आणि हे संशयास्पद आहे असे फडणवीस म्हणाले.मृतदेहाचे हाथ मागे बांधलेले नव्हते असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलय व तसेच सचिन वझे यांनी अर्णब गोस्वामीला अटक केली म्हणून तुमचा राग आहे का ?असा सवाल केला. काही वृत्तवाहिन्यांच्या कार्यक्रमाला सचिन वझे यांनी शिवसेना प्रवक्ते म्हंणून हजेरी लावली असल्याची चर्चा आहे. शिवसेनेत असल्याने सचिन वझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे समजले जातात. नाईक आत्महत्या प्रकरणात अटक केलेल्या टीम चे नेतृत्व सचिन वझे करत होते. तसच अर्णब गोस्वामीच्या कथित टीआरपी घोटाळ्याची चौकशी देखील सचिन वझेच करत आहेत अशी हि चर्चा होत आहे. यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले,”सचिन वाझे यांच्याबाबत संशयाचं वातावरण निर्माण करणं चुकीचं आहे, योग्य प्रकारे तपास होईल हे सांगितले आहे. तरीही,या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नका अस आमचं मत आहे.
या आरोपांवर सचिन वझे यांनीसुद्धा आपली भूमिका व्यक्त केली. मी घटनास्थळी सर्वात आधी गेलो नव्हतो व मला मनसुख यांच्या मृत्यू प्रकरणी काहीच माहिती नाही, गाडी सापडली तेंव्हा सर्वात आधी गावदेवी पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी तेथे पोहोचले होते. त्यानंतर इतर अधिकारी तेथे पोहचले होते व त्या सगळ्यानंतर मी तिथे पोहचलो होतो अशी माहिती सचिन वझे यांनी माध्यमांना दिली.