इकॉनॉमी

राधाकिशन दमानी यांनी खरेदी केला तब्बल एक हजार एक करोड रुपयांचा बंगला

दमानी यांच्या कार्यालयाने दिले ३० कोटी रुपये मुद्रांक शुल्क

दमानी कुटुंबाने मागील दोन महिन्यात खरेदी केलेली ही तिसरी मोठी संपत्ती

देशातील अब्जाधीश व्यावसायिक व DMart चे मालक राधाकृष्ण दमानी यांनी नुकताच एक बंगला मलबार हिल्स मुंबई येथे विकत घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार या बंगल्याची किंमत तब्बल 1001 कोटी रुपये इतकी आहे. दमानी यांनी आपल्या लहान भावासह म्हणजेच गोपिकीशन दमानी यांच्यासोबत हा बंगला खरेदी केला असल्याचे समजते आहे.
एका बातमीनुसार ‘मधूकुंज’ नावाचा हा बंगला दीड एकरपेक्षा जास्त क्षेत्रामध्ये पसरला असून त्याचे क्षेत्रफळ 60 हजार चौरस फूट इतके आहे. देशात निवासी मालमत्तेच्या बाबतीत अलीकडे झालेला सगळ्यात मोठा व्यवहार म्हणून या घराच्या खरेदीची सगळीकडे चर्चा आहे.

कोण आहेत राधाकिशन दमानी?

महाराष्ट्राच्या कराड येथे एक मारवाडी कुटुंबात जन्मलेले राधाकिशन दमानी यांचे वडील शिवकिशनजी दमानी हे सुद्धा शेयर बाजाराशी संबंधित काम करत असत त्याचबरोबर त्यांचा बॉल बेअरिंग चा व्यवसाय सुद्धा होता. राधाकिशन दमानी यांनी मुंबई विद्यापीठात बी.कॉम साठी प्रवेश घेतला पण पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला असताना त्यांज कॉलेज सोडून काम सुरू केले. वडिलांच्या मृत्यूनंतर शेयर बाजारात गुंतवणूक करायला दमानी यांनी सुरुवात केली व हळू हळू या व्यवसायात जम बसवला.
दमानी यांनी त्यांचे भाऊ गोपिकीशन दमानी यांच्यासोबत शेयर बाजारात काम सुरू केले आणि VST industires, Samtel limited, Somany Ceramics, 3M India, Jay Shree Tea, Jubilant Foodworks यांसारख्या व्यवसायामध्ये प्रमुख गुंतवणूकदार बनले. शेयर मार्केट मध्ये बरीच वर्षे गुंतवणूक केल्यानंतर दमानी यांनी 2002 मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
2002 मध्ये पवई, मुंबई येथे DMart ची पहिली शाखा उघडल्यानंतर दमानी यांनी व्यावसायिक आयुष्यात मागे वळून पाहिले नाही. आज D Mart च्या देशभरात 200 शाखा आहेत आणि 2017 मध्ये त्यांच्या Avenue Supermakert या कंपनीला सार्वजनिक केल्यानंतर राधाकिशन दमानी हे मुकेश अंबाणीनंतर देशातील सगळ्यात श्रीमंत नागरिक बनले.
दमानींच्या पांढऱ्या शर्ट आणि पॅन्ट वापरण्याच्या आवडीमुळे भारताच्या आर्थिक विश्वात ‘Mr. White and White’ असे सुद्धा म्हणतात.
दमानी यांच्या कुटुंबाने खरेदी केलेल्या या महागड्या घरामुळे राधाकिशन दमानी पुन्हा एकदा माध्यमांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *