इंटरटेनमेंट

सरोज खानकडून चित्रपटाचे नामकरण ‘राग’

राग – म्युझिक ऑफ लाइफ लवकरच २६ मार्च २०२१ रोजी सिनेमामध्ये रिलीज होणार आहे. प्रत्यक्षात हा चित्रपट २०१६ मध्ये रिलीज होणार्‍या “बाबूजी एक तिकिट बंबाई” चित्रपटाची पुन्हा संपादित आवृत्ती आहे. आधीच्या काळात अनेक कारणांमुळे रिलीज होऊ शकली नाही.

काल सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. परिस्थितीबद्दल निर्माते पीयूष मुंढादा म्हणाले की, “आम्ही २०१६ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर नोटाबंदी झाली. त्यानंतरच्या महिन्यात ही रोकड टंचाई निर्माण झाली, यामुळे मोठा व्यत्यय निर्माण झाला. लोक त्यांच्या नोटा बदलून घेण्याचा प्रयत्न करीत होते आणि रोख रकमेची देवाणघेवाण करण्यासाठी गर्दी होती. म्हणूनच आम्ही त्यानंतर रिलीज पुढे ढकलले. त्यानंतर, हा चित्रपट २०१७ मध्ये कान्स येथे प्रदर्शित करण्या साठी निवडला गेला जिथे आम्हाला कोणतेही पारितोषिक मिळाले नाही पण कौतुक झाले. “

संभाषण सुरू ठेवत पियुष म्हणतो; “कान्स येथे स्क्रीनिंगनंतर मी सरोज जीला भेटलो आणि ती म्हणाली की आमचा संपूर्ण प्रकल्प पुन्हा पाहावा लागेल आणि कदाचित त्यास पुन्हा संपादन करावे लागेल असा त्यांना वाटत होते. आम्ही चित्रपटाचे पुन्हा संपादन करण्याचे मोठे काम केले, आवश्यकते नुसार काही गोष्टीं मध्ये री-डबिंग आणि तांत्रिक बदलाचा समावेश करण्यात आला होता. सर्व काही झाल्यावर आम्ही नाव बदलण्याचा विचार केला. काही अन्य लोकांनी सुद्धा आम्हाला “बम्बई” च्या जागी मुंबई शब्द वापरण्यास सांगितले. ‘मुंबई’ हे नाव आणि त्या नावातच भावना जोडल्या गेल्या आहेत. सरोजजींनी असेही सुचवले की हे नाव नृत्य करणाऱ्या समाजाबद्दल असलेल्या चित्रपटाला हे नाव शोभत नाही. म्हणून सर्वांनी पुन्हा बरेच दिवस विचार विनिमय करून ‘राग’ हे नवे नाव ठेवले, जे लहान आणि योग्य आहे. जेव्हा सर्व काही निश्चित झाले, तेव्हा साथीच्या रोगाचा प्रसार झाला आणि अचानक नको ते घडले. आम्ही या प्रकल्पातील कणा असलेली सरोज जी यांना गमावले. हा चित्रपट त्यांना श्रद्धांजली आहे. आणि मरणोत्तर प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट आहे. त्यांच्या आशीर्वादाने नेहमीच आपले मार्ग उजळतील. “

अरविंद त्रिपाठी यांच्या या प्रकल्पात राजपाल यादव, राकेश बेदी, सुधा चंद्रन, मोहन जोशी, यशपाल शर्मा, मिलिंद गुनाजी, मनीषा मार्झारा, किरण शरद, रघुबीर यादव, हिना पांचाल इत्यादी कलाकारांचा समावेश आहे. मोहित चौहान, पलक मुचल, ममता शर्मा, शान आणि शबाब शबरी यासारख्या नामांकित गायकांनी गाणी गायली आहेत आणि टी-सीरीजचे संगीत आहे.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *