यंदा दुसऱ्या ऑस्कर नामांकनाची यादी जाहीर करण्याचा मान प्रियंकाचा!
बॉलीवूडनंतर आता हॉलीवुडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रियंका चोप्राला यावर्षी ऑस्कर नामांकन जाहीर करण्याची सुवर्ण संधी मिळालेली आहे.
त्यामुळे २०२१ च्या ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यात प्रियंका विशेष आकर्षण असणार आहे.
ज्या ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यात प्रियंका ऑस्करची नामांकने जाहीर करताना दिसणार आहे .
द अकॅडमीच्या अधिकृत अकाउंटवरून प्रियंकाचे “बिहाईंड द सीन”चे काही छायाचित्र शेअर केले गेले आहेत.
ज्यात प्रियंकाने ब्लॅक आणि सिल्वर कलरचा आऊटफिट घातलेत. हा तिचा ग्लॅमरस लूक चाहत्यांच्या पसंतीस पडतोय.
भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या सकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी ऑस्करच्या ९३ व्या पुरस्कार सोहळ्याची नामांकने जाहीर करण्यात येणार आहेत.
रोजेरिया डॉसन, रिबेल विल्सन आणि मिशेल राड्रीग ह्या हॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांसोबत प्रियंका ही ऑस्कर नामांकनाची यादी जाहीर करणार आहे.
ऑस्कर नामांकनाची यादी जाहीर करण्याचा मान नेहमी हॉलीवुडमधल्या ए लिस्टमध्ये सामील असणाऱ्या कलाकारांनाच दिला जातो,
त्यामुळे प्रियंकासाठी ही खूप अभिमानास्पद बाब आहे.
अलीकडेच प्रियंकाचा “बेवॉच” हा हॉलिवूड सिनेमा प्रदर्शित झालाय.
तुर्तास प्रियंकाकडे एकही बॉलिवूड प्रोजेक्ट नसुन शेवटी ती बाजीराव मस्तानी या चित्रपटात दिसली होती.
यानंतर प्रियंका संपूर्ण वेळ हॉलिवूडमध्ये व्यस्त आहे .