वेगळ्याच अवतारात अवतरली प्रियंका चोप्रा
प्रियंका चोप्राची स्टाईल आणि ग्लॅमरमध्ये कोणाशीच बरोबरी होऊ शकत नाही. याचा अंदाज तिचे नुकताच केलेले फोटोशूट पाहून लावू शकतो.
प्रियंकाने नुकतेच लाल रंगाच्या आउटफिटमधून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
तिने हे आउटफिट नवरा निक जोनसचा म्युझिक अल्बम स्पेसमॅनच्या प्रमोशनसाठी परिधान केला होता. या दरम्यान तिचे फोटोशूट झाले आणि त्यावर सगळ्यांचे लक्ष होते.
तिच्या अंगाला चिटकलेला बॉडीफिट ड्रेसची चर्चा अमेरिकन मीडियातही चर्चेत आला आहे.
तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.प्रियंका चोप्राच्या लाल रंगाच्या या आउटफिटमध्ये वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो क्लिक करण्यात आले.
प्रियंकाचा नवरा आणि अमेरिकन सिंगर निक जोनसचा म्युझिक अल्बम स्पेसमॅनबद्दल सांगायचे तर निकने सोशल मीडियावर बरेच पोस्ट शेअर केले आहेत.

प्रियंकाने स्पेससूटमध्ये फोटो शेअर करत लिहिले की, अभिनंदन निक मला माहित आहे की तुझ्यासाठी हे किती जवळचे आहे आणि ज्याप्रकारे तू माझ्यावर प्रेम दाखवतो.
त्यासाठी मी आभारी आहे. ही अल्बम कलेचा एक नजराणा आहे. माझ्या तुझ्यावर प्रेम आहे.
प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर नुकतीच ती राजकुमार रावसोबतच ‘द व्हाईट टायगर’मध्ये दिसली.
लवकरच ती सॅम ह्यूएन आणि सेलिन डायॉनसोबत ‘टेक्स्ट फॉर यू’आणि कियानू रीव्ससोबत ‘मॅट्रिक्स 4’ या सिनेमात दिसणार आहे.