सध्या झी मराठी या चॅनलवर सुरू असलेली कारभारी लयभारी ही मालिका प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसत आहे. या मालिकेतील पात्रांची आता प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पडली आहे. त्यातच कारभारी लयभारी या मालिकेतील खास गोष्ट आज सगळ्यांसाठी आनंदाची आहे. ती म्हणजे मालिकेतुन ट्रान्सजेंडरने सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. त्याचबरोबर माणूस जातीला काळिंबा फासणारी घटना या ट्रान्सजेंडरच्या बाबतीत घडली आहे.
कारभारी लयभारी या मालिकेत गंगा नावाची भूमिका साकारणारी ट्रान्सजेंडर हिने संपूर्ण महाराष्ट्राला डान्सिंग क्वीन या शो मधून थिरकायला लावले होते. आता तीने सिनेसृष्टीत प्रवेश करून ट्रान्सजेंडर स्वतःला हवे ते करू शकतात, हे दाखवून दिलं. या ट्रान्सजेंडरचं नाव प्रणित हाडे आहे. पण तिच्यासोबत असा प्रकार घडला की ती शारीरिक दृष्ट्याच नाही तर मानसिक दृष्ट्याही खचून गेली.
ती आणि तिचा मित्र एका बस स्टॉप वर उभे असताना एका ट्रान्सजेंडरने अचानक तिला उलट सुलट बोलायला सुरुवात केली. आणि बोलता बोलता त्या व्यक्तीने तिच्यावर हाथ उचलला, यावेळी तिच्यासोबत असलेल्या तिच्या मित्राने तिला वाचवायचा प्रयत्न केला, पण ती व्यक्ती काहीही केल्या थांबायला तयार नव्हती. सलग २५ मिनिटे गंगा मार खात होती. आणि लाजिरवानं म्हणजे या रस्त्यावर येणारे जाणारे सर्व लोक गंमत बघत होते. पण तिला वाचवायला कोणीही त्या ठिकाणी आले नाही. सर्वांनी प्रेक्षकांसारखी बघ्याची भूमिका तिथे घेतली. यानंतर तिने सोशल मीडियावर लाईव येऊन सर्व प्रकार रडत रडत सांगितला.
या घटनेने तिला पूर्ण हादरवून टाकले आहे. आता पुढे काय करावं हे तिला कळत नाहीये. अशा प्रकारच्या वागणुकीने ती पूर्ण भयभीत झालेली आहे, असं तिने सांगितले आहे.