पेट्रोल, डिझेल चा वापर २०२१-२२ मध्ये १३% वाढण्याचा अंदाज ; विक्रमी वाढ नोंदवण्याची शक्यता.
चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत भारत २०२१-२२ मध्ये १३% अधिक डिझेल आणि पेट्रोलचा वापर करणार असून, जागतिक ऊर्जेच्या मागणीत अग्रभागी आपले स्थान कायम राखण्यासाठी, सहा वर्षातील सर्वात वेगवान, वार्षिक वाढ नोंदवल्या जाणार आहे.
सरकारच्या अंदाजानुसार गेल्या वर्षीच्या कोविड-१९ महामारीने मंदावलेली अर्थव्यवस्था पुन्हा वेग घेत असल्याने अन्य परिष्कृत उत्पादनांच्या मागणीतही विक्रमी वाढ होईल. तेल मंत्रालयाच्या “पेट्रोलियम नियोजन व विश्लेषण कक्ष” (पी पी ए सी) द्वारे २०२०-२१ मध्ये अंदाजानुसार २१५ दशलक्ष टन किंवा १९६ दशलक्ष टनांपेक्षा १०% जास्त पेट्रोलियम उत्पादनांचा वापर केल्या गेला आहे.
२०२० मधील लॉकडाऊन दरम्यान वापरात घट झाल्यामुळे आणि दीर्घकाळ चाललेल्या अनलॉक प्रक्रियेमुळे विक्रमी वाढीचा अंदाज मांडण्यासाठी एक कमी बेस तयार होतो.२०२१-२२ मध्ये दर्शवल्या जाणाऱ्या विमान इंधन वापराच्या ७४% वाढीच्या पीपीएक अंदाजावरून हे स्पष्ट होते. हे अंशतः कारण असे की विक्री अजूनही फेब्रुवारी २०२० च्या तुलनेत ४० टक्क्यावर आहे . नंतर आलेल्या महामारी मुळे विमानसेवा जवळपास ठप्प झाली होती पण आता , उड्डाण सेवा सामान्य स्थितीत परत येताच, मागणी वाढल्याने विक्रम वाढ होईल.आणखीन एलपीजीचा वापरात देखील २०२१-२२ मध्ये ५ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.