पॉलिटीक्स

मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची हकालपट्टी

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची हकालपट्टी केली असून सध्या राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यभार पाहणारे हेमंत नगराळे आता नवे मुंबई पोलीस आयुक्त असतील,अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी द्विटरच्या माध्यमातून दिली.

नेमके हेमंत नगराळे आहेत तरी कोण?

हेमंत नगराळे हे आयपीएस अधिकारी म्हणून राज्यातील अनेक जिल्ह्यांसह दिल्लीसारख्या राजधानीच्या शहरात सेवा देणारे अधिकारी आहे. राजुरा या चंद्रपूर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात त्यांना प्रथमत: पोस्टिंग मिळाली होती.सोलापूरमध्ये १९९२ ते १९९४ या काळात त्यांनी पोलीस उपायुक्त म्हणून कर्तव्य बजावले.रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक असताना दाभोळ ऊर्जा कंपनीशी संबंधिक भूसंपादनाचं प्रकरण त्यांनी १९९४ ते १९९६ या काळातच हाताळलं होतं. पोलीस अधीक्षक, सीआयडी व गुन्हे शाखेत १९९६ ते १९९८ मध्ये विविध पदांवर असताना त्यांनी राज्यव्यापी असलेल्या एमपीएससी पेपर फुटी प्रकरणाची चौकशी केली होती.२०१६ मध्ये नगराळे हे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त होते. त्यावेळी तेथील बँक ऑफ बडोद्यावरील दरोड्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. या दरोड्याची देशभर चर्चा झाली होती. नगराळे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं अवघ्या दोन दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला होता.
     नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना २०१८ साली नगराळे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्याकर्जवसुली प्रकरणात बँकेचे अध्यक्ष व संचालकांविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश नगराळे यांनी दिला होता. त्यात शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांचाही समावेश होता. विधान परिषदेच्या सभापतींच्या मंजुरीशिवाय कोणत्याही आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल न करण्याचा नियम आहे. हा नियम मोडल्याबद्दल नगराळे यांच्यासह पोलीस उपायुक्त तुषार जोशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *