मल्याळम अभिनेता पी .बालचंद्र काळाच्या पडद्याआड
जेष्ठ मल्याळम अभिनेते नाटककार आणि लेखक पी. बालचंद्र यांचे निधन झाले. ते ६२ वर्षाचे होते .मल्याळम सिनेमा आणि साहित्यात त्यांनी मोलाचे योगदान दिलं .
गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
पद्मनाभन बालचंद्र यांचा जन्म २ फेब्रुवारी १९५२ रोजी केरळ मधील कोल्लम जिल्ह्यात झाला.
१९८२ शाली प्रदर्शित झालेल्या रिचर्ड ॲटनबरो यांच्या गांधी या चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली.
यासोबतच त्यांनी त्रिवंद्रम लॉज, थँक्यू, सायलेन्स यासारख्या चित्रपटांमध्ये ही दमदार भूमिका साकारल्या.
अंकल बन ,कल्लू कोंडोरू पन्नू, पोलीस यासारख्या चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या होत्या २०१२ मध्ये त्यांनी ‘ मेघरूपन’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.
कभी पी कुन्हीरामन नायर यांच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आधारित होती .
‘पावम उस्मान’ हे त्यांनी लिहिलेलं नाटक प्रचंड गाजलं. या नाटकासाठी त्यांना केरळ साहित्य अकादमी पुरस्कार आणि केरळ प्रोफेशनल नाटक पुरस्कार मिळाले होते.
अभिनेते ममूटीची मुख्य भूमिका असलेल्या एका चित्रपटात ते शेवटचे झळकले होते.
बालचंद्र यांच्या पश्चात पत्नी श्रीलता आणि श्रीकांत ,पार्वती ही दोन मुलं आहे आहेत. त्यांच्या निधनाच्या वृत्तीने दक्षिणात्य चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली
असून अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.