ओपेकने मागणीकडे दुर्लक्ष केल्यानंतर भारत आता कमी करणार सौदी अरेबियाकडून तेलाची आयात
नवी दिल्लीत जास्त पुरवठा करण्याच्या आवाहनाकडे ओपेकने दुर्लक्ष केल्यानंतर देशातील रिफायनरी कच्चा तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींची झपाट्याने होणारी वाढ मंद करण्यासाठी सौदी अरेबियाकडुन कमी बॅरल खरेदी करण्याचा विचार करीत आहेत.
असे केल्यास दशकांपासून असलेले सौदी सोबतचे संबंध बिघडू शकतात यामुळे यावर अजून काही ठाम निर्णय झालेला नाही.
सौदी आणि त्याच्या सहयोगी संघटनांनी उत्पादनात घट केल्याने बुधवारी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊन ६८ डॉलर प्रति बॅरल पर्यंत किमती पोहोचल्या आहेत. त्यामुळे भारतीय इंधनाचे दर उच्चांक गाठत चालले आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन एचपीसीएल बीपीसीएल आणि एम आर पी एल यांनी मे महिन्या साठी सौदीकडून तेल खरेदी कमी करण्याचा संभाव्य तेवर चर्चा केली आहे आणि रियाधला याबाबत कळवण्यासाठी ५ एप्रिल पर्यंतचा वेळ दिला आहे.
कोरोना च्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे ठिकठिकाणी होणारे बंद आणि लावल्या गेलेल्या निर्बंधांमुळे देखील मे महिन्यात मागणी कमी असू शकते. यामुळेही सौदी अरेबिया कडून कमी तेल विकत घेतला जाऊ शकते.
रिफायनर्सचे सौदी अरेबिया बरोबर वार्षिक करार आहेत आणि त्यांच्या मासिक गरजे बद्दल सुमारे चार आठवड्यांपूर्वी माहिती सौदी अरेबियाला दिली गेली पाहिजे. हे वार्षिक करार परस्पर विश्वासावर चालतात व काही नियम मोडल्यास कुठल्याही प्रकारची शिक्षा होत नाही परंतु सौदी अरेबिया आणि भारतीय रिफायनरी हा करार दशकांपासून काटेकोरपणे जपला आहे.
सौदी अरेबियाच्या तेल मंत्र्यांनी अलीकडेच पुरवठा वाढवण्याचा मागणीकडे दुर्लक्ष करताना दिल्लीला “सध्याचे उच्च किमतींशी लढा देण्यासाठी आपले देशातील स्वस्त तेल साठ्यात डुंबा” अशी सूचना दिल्यानंतर जगातील तिसरा सर्वात जास्त आयात करणारा देश, भारत आता संतापला आहे.
सौदीकडून तेल न घेता पर्यायी दुसरीकडून कुठूनही घेतले तरी किमतीमध्ये जास्त फरक पडणार नाही कारण भारतीय रिफायनर्सना बाजारभावाप्रमाणेच ते विकत घ्यावे लागेल असे अनेकांचे मत आहे.
स्वतःला तेल उद्योगाचे कर्ताधर्ता समजणाऱ्या सौदी अरेबिया आणि अनेक दशकांपासून भारताशी चांगले संबंध ठेवले आहेत त्यांना अलिकडच्या वर्षांत केवळ बळकटी मिळाली आहे.
अनेक वर्षांसाठी सौदी अरेबिया भारताला सर्वात जास्त पुरवठा देणारा अव्वल क्रमांकावरील देश होता परंतु स्वतः लादलेल्या उत्पादन घट व निर्यात घटी मुळे हा मान सौदी आता गमावून बसला आहे